1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव!

WD
सर्व प्रथम म्हणजे तुम्ही तुमच्या घरावर माणसांवर, तसेच तुमच्या शेतीवरती खूप प्रेम करता. तुम्ही बैलासारखे कितीही ओझे ओढून नेण्याची ताकद ठेवतात. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तुम्ही खूप कष्ट करतात. त्यामध्ये फक्त मजुरी नसते, तर त्यामध्ये प्रेम असते प्रामाणिकपणा असतो.

तुमच्याकडे उत्कृष्ट प्रतिची उद्योग प्रियता आहे. व्यवहार कुशलते बरोबर काम करण्याची चिकाटी आहे. तुम्ही निर्मीती, क्षम, सर्जनशील आहात. तुमची सहनशीलता आणी आशावाद जबरदस्त आहे. वृत्ती निश्चयात्मक असून तुम्हाला सत्तेची भयंकर लालसा आहे. सगळया जगातल्या सुखसोयी तुम्हाला हव्या अस्तात.

WD
विश्वासार्हता आणि चिकाटी हेच तुमचे मुख्य गुण आहेत जे तुमचे आयुष्य तारायला तुमच्या इच्छा आकांशा पूर्ण करायला शकतात.

त्याच प्रमाणे तुम्ही खूपच प्रॅक्टीकल आणि हट्टी आहात. परंतु तुमची इच्छा शक्ती तुमचा विश्वास, चिकाटी, एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्तीमुळे तुम्ही प्रतीकूल परीस्थितीमध्येही चांगल्या रितीने टिकून राहतात.

तुम्हाला सहसा कोणाशी शत्रुत्व करायला आवडत नाही. पण जर का तुमचे कोणाशी शत्रुत्व झालेच तर तुम्ही इथे मात्र थेट बैलाप्रमाणे थेट शिंगावरच घेता. तुम्ही तुमची नातीही छान प्रकारे टिकवता, जसे ज्याच्याकडे बैल त्याची शेती, अगदी तसेच ज्याची वृषभ राशी सोबती तिथे मायेची नाती.