शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

सुंदर दिसायचे असेल तर शुक्र मजबूत करा, काही सोपे उपाय

।। ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः।। 
प्रत्येकाला सुंदर आणि आकर्षक दिसण्याची आवड असते. सुंदरता म्हणजे आपल्याला चेहर्‍यावर हसू असले पाहिजे आणि आपण नेहमी फ्रेश दिसला पाहिजे. कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करून आपण आपली आकर्षण शक्ती वाढवू शकता. पाहू काही सोपे उपाय-

1. चांदीची अंगठी घाला किंवा पार्टनरच्या बोटात हिर्‍याची अंगठी घाला.
 

2. आपल्या आहारात साबुदाणा सामील करा. दुधाने निर्मित वस्तू सेवन केल्यानेदेखील शुक्र मजबूत होईल.

3. रोज सॉफ्ट म्युझिक ऐका. वाद्य संगीत जसे बासरी, सतार इत्यादी ऐकण्याने शुक्र मजबूत होईल. लाउड गाणी गाणे आणि ऐकणे टाळा.

4. शुक्रवारी मीठ खाऊ नका.

5. पत्नी/पती चा सन्मान ठेवा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा.