शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 27 एप्रिल 2022 (12:21 IST)

जर तुमच्या स्वप्नातही पाऊस पडत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पाऊस येणे खूप शुभ मानले जाते. तुमच्या स्वप्नातही पाऊस आला असेल, तर जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय असेल शुभ-
 
रिमझिम पावसाचे स्वप्न
रिमझिम पाऊस पाहणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नात पाणी पाहणे हे लक्षण आहे की तुमचा येणारा काळ खूप आनंददायी असेल.
 
पावसाची स्वप्ने पाहणे
पावसाचे स्वप्न पाहणे म्हणजे चांगले दिवस येत आहेत, हे करिअरमध्ये यश आणि चांगली बातमी मिळण्याचे लक्षण आहे. त्याचा एक अर्थ असाही मानला जातो की येणाऱ्या काळात देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल.
 
विहिरीच्या पाण्याचे स्वप्न पाहणे
हे अचानक धन मिळण्याचे लक्षण आहे. हे खूप चांगले मानले जाते.
 
नदीच्या पाण्याचे स्वप्न
स्वप्नात नदीचे पाणी पाहणे खूप शुभ मानले जाते, याचा अर्थ तुमची अपूर्ण स्वप्ने लवकरच पूर्ण होणार आहेत. असे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आयुष्यात येणारे संकट लवकर दूर होतात.
 
तुमच्या घरी पाऊस पडण्याचे स्वप्न
स्वप्नात घरात पाऊस दिसला तर ते अशुभ मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की घरात भांडणे आणि वाद होतील आणि आगामी काळात कुटुंबातील एखाद्या सदस्याला मोठा आजार होऊ शकतो.