शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

लाल किताब: मंगळ दोष आणि त्यावरील उपाय

मंगळ दोषाचे उपाय सांगण्यापूर्वी मंगळ दोष नेमकं काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश भाव मध्ये मंगळ असतं तेव्हा मांगलिक दोष लागतात. हा दोष विवाहासाठी अशुभ ठरतो. परंतू लाल किताब यानुसार दोन प्रकाराचे मंगळ असतात मंगळबद आणि मंगळनेक.
 
मंगळबद अर्थात वाईट मंगळ आणि मंगळनेक अर्थात चांगलं मंगळ. वाईट मंगळामुळे व्यक्तीच्या जीवनात वाईट घडतं आणि चांगल्या मंगळामुळे चांगलं. म्हणतात की मंगळबद असणारी व्यक्ती क्रोधी, जिद्दी आणि अपराधी प्रवृत्तीची असते आणि मंगळनेक असणारी व्यक्ती समजूतदार, साहसी आणि उच्चपदावर आसीन असते.
 
वयाच्या 28 वर्षानंतर मंगळ दोष स्वत: समाप्त होतं असे मानले गेले आहे. ज्योतिषाचार्यांच्या प्रमाणे केंद्र मध्ये चंद्र असल्यास मंगळ दोष मानला जात नाही. मंगळ परिहारचा अनेक स्थितिया आहेत. ज्योतिष विद्यानुसार मंगळ असलेल्या मुलीचं विवाह मांगलिक मुलाशी करवावं ज्यामुळे मंगळ आणि शनीचा मिलाप व्हावा अर्थात मुलीच्या कुंडलीत शनी भारी असल्यास मंगळ दोष नाहीसा होतो. परंतू लाल किताबाप्रमाणे मंगळ आणि शनीचा मिलाप होत नसतो. असो, जर आपल्याला मंगळ दोष असल्याचं जाणवतं असेल तर लाल किताब याप्रमाणे पाच पांच अचूक उपाय सांगण्यात आले आहे. हे अमलात आणून चांगले परिणाम प्राप्त करता येऊ शकतात.
 
पहिला उपाय-
लाल किताबाप्रमाणे मंगळाचा प्रभाव डोळे आणि रक्तात असतो. म्हणून यांना योग्य करणे गरजेचे आहे. यासाठी डोळ्यात पांढरं काजळ लावावं आणि पोट नेहमी स्वच्छ असू द्यावं. याने रक्त शुद्ध होतं. पांढरं काजळ मिळत नसल्यास काळं काजळ लावू शकता. विशेष करून मंगळवार आणि शनिवार या दोन्ही दिवस तरी काजळ लावावं. असे किमान 43 दिवसापर्यंत करावे. काजळ लावल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील हे योग्य ठरतं.
 
दुसरा उपाय-
लाल किताबाप्रमाणे भाऊ लहान असो वा मोठा, सख्खा असो वा सावत्र आपला भाऊ मंगळ आहे. भावाला खूश ठेवल्याने मंगळ चांगलं राहील. भावाशी दुश्मनी म्हणजे वाईट मंगळ. म्हणून आपल्या भावाचं लक्ष ठेवा. त्याच्या चुकांना माफी देत त्याला प्रेमाने समजवणे आपल्यासाठी योग्य ठरेल. त्याशी वाद घालणे टाळा. 
 
तिसरा उपाय-
मंगळाची दिशा पश्चिम आहे. घराच्या दक्षिणेत कडुनिंबाचं झाड लावावं. झाडं लावणे शक्य नसल्यास दर मंगळवारी झाडाला पाणी घालावे.
 
चौथा उपाय-
दररोज हनुमान चालीसाचा पाठ करावा. दोन ते तीन महिन्यातून एकदा हनुमानाला चोला चढवावा. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दिवा किंवा धूप जाळावं. याने मंगळच नव्हे तर शनी, राहू, केतूचे दोष देखील नाहीसे होतात.
 
पाचवा उपाय-
मांसाहार खाणे टाळावे. मांसाहाराचा त्याग करावा. घरातून निघताना गूळ खाऊन निघावे. दुसर्‍यांना देखील गूळ खाऊ घालावा. याने रक्त शुद्ध होतं. रक्त शुद्ध झाल्यास मंगळ दोष नाहीसा होतो. गूळ आणि चण्याचे सेवन करावे आणि हनुमानाला देखील गूळ- चण्याचा नैवदे्य दाखवावा.