गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (13:41 IST)

7 जुलैपासून या 4 राशींचे भाग्य बदलेल, शुक्र गोचरचे फायदे मिळणार

Shukra Gochar 2024 ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र 07 जुलै 2024 रोजी 04 वाजून 15 मिनिटाला कर्क राशित गोचर करत आहे यानंतर 11 जुलै रोजी शुक्र कर्क राशीत जाईल आणि त्यानंतर 31 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे खूप फायदा होणार आहे. वास्तविक या संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडणार आहे. पण या राशींना या काळात खूप मोठा फायदा होणार आहे. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तर तुमच्या राशीचा यात समावेश आहे का ते जाणून घ्या-
 
मेष- शुक्र गोचरमुळे मेष राशीच्या जातकांवर भगवान विष्णूंची कृपा होणार आहे. नौकरीत असल्यास मोठ पद मिळेल. जोडीदाराशी असलेले वाद मिटतील. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. घरामध्ये समृद्धी राहील.
 
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
 
तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. उत्पन्न वाढेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना फायदा होईल.
 
मकर- मकर राशीच्या लोकांना या मार्गक्रमणात फक्त लाभ मिळतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. मालमत्ता खरेदीचे योग येतील. आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसायातही फायदा होईल.