1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

शहाळ्याचे फायदे जाणून घ्या …

अडसर- कोवळा फक्त पाणी पिण्यायोग्य. किंचित साईसारखी मलई असलेला नारळ असेल तर त्यास शहाळे, काकडे, काबा या नावांनी ओळखले जाते.
 
उचकी लागली असता शहाळ्याचे पाण्यात बर्फ टाकून घ्यावे.
 
उष्णतेमुळे अंगाचा दाह होत असल्यास शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून घ्यावे.
 
अर्धशिशीच्या विकारात रात्री शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी झाकून ठेवावे.
 
रक्तप्रमेहात शहाळ्यातील अर्धे पाणी काढून टाकून राहिलेल्या पाण्यात दोन चिमटी तुरटीची पावडर टाकून तोंड बंद करून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी मुखमार्जन करून हे पाणी नीट ढवळून घ्यावे. 3-4 दिवस हा उपचार करताच गुण नजरेस येतो.
 
डोके भ्रमिष्टासारखे होत असल्यास रोज नेमाने सकाळी एक शहाळे घ्यावे.
 
लहान मुलांना सर्दीचा त्रास जाणवत असल्यास शहाळ्यातील मलईदार खोबरे चांगले घोटून खावयास द्यावे.
 
मोठी जखम भरून येण्यासाठी शहाळ्यातील घोटलेल्या मलईदार खोबऱ्याचा लेप करावा.
 
अकाली पडणाऱ्या सुरकुत्या टाळून चेहरा सतेज दिसण्यासाठी शहाळ्यातील मलई चांगली घोटून लोण्यासारखी झाल्यावर चेहऱ्यास लावावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा हळूवारपणे धुऊन सुती कापडाने चांगला टिपून घ्यावा.
 
लघवीच्या विकारात शहाळ्याचे पाण्यात संत्रे/लिंबाचा रस टाकून वरचेवर घेत राहावे.