रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (20:19 IST)

हे Health Advice नक्की करून पाहा : आरोग्य सल्ला

आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे.
 
आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे.
 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. नियमित पोषक आहार घेणष गरजेचे आहे. यामुळे शरीराची चांगली वाढ होऊन तंदुरूस्ती प्रदान होते.
   
आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या. संपूर्ण व सकस आहार शरीरीस आवश्यक असते. नाहीतर शरीरात पोषक द्रव्यांची कमी येते.
 
आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मास, अंडी, मासळी, फळे यामुळे पदार्थाचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिन मिळते. शरीरास व्हिटिमिन आवश्यक असते. योग्य समतोल आहार घ्यावा.
 
उन्हात पाणी पिणे आणि सावलीत बसुन जास्त वारा घेणे टाळावे, यावेळेस योग्य समतोल साधणे उपयुक्त ठरू शकते. यासोबतच अती उन्हात फिरणे टाळल्यास उष्माघातासारख्या प्रकारापासून मुक्त राहाल. सकाळी व सायंकाळी कामे आटोपावीत.
 
ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. 
 
एक मुठ भुईमुंगाचे दाणे भाजून दहा ग्रॅम गुळाबरोबर चावून खावे. न्याहारीच्या वेळेस असे केल्यास आवश्यक मात्रेत ऊर्जा प्राप्त होते. हिवाळ्यात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. सिन्ग्ध पदार्थांचे सेवनही चांगले असते.
 
कदा वापरलेले गोडेतेल दुसर्‍यांदा वापरताना खाली तळाला बसलेला गाळ काढून मग ते तेल वापरण्यास घ्यावे. असे तळणाचे तेल दुसर्‍यांदा न वापरनेच चांगले, ते तेल दिवे लावणे, यासारख्या कामासाठी वापरता येईल. तेल ताजेच ठिक.
 
एकमेकांचे कपडे वापरू नये. दुसर्‍यांचा कंगवा, टॉवेल इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी वाढतात. प्रत्येकासाठी या वस्तू स्वतंत्रपणेच वापरणे अधिक चांगले, स्वच्छतेकडे यातून लक्ष द्यावे.