शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (21:18 IST)

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त 10 रुपये खर्च करा

अनेक लोक कॅल्शियमच्या कमीमुळे हाड कमजोर झाल्याची तक्रार करत असतात. तर आज आम्ही आपल्याला असे 7 सोपे आणि स्वस्त उपाय सांगत आहोत ज्यामुळे कॅल्शियमची कमी दूर करता येईल. मात्र दोन ते दहा रुपये यात बसणारे हे उपाय विशेष त्या लोकांसाठी आहे जे दूध किंवा दुधाने तयार पदार्थ घेत नाही.
 
1. पाण्यात आलं टाकून उकळून घ्या. या पाण्यात मध मिसळून लिंबाचे दोन- तीन थेंब टाका. किमान 20 दिवस सकाळी याचं सेवन करा. कॅल्शियमची आपूर्ती होईल.
 
2. दररोज 2 चमचे तिळाचे सेवन करा. आपण हे लाडू किंवा चिक्कीच्या रूपात देखील घेऊ शकता.
 
3. एक चमचा जिरं रात्रभरासाठी पाण्यात भिजवून द्या. सकाळी याचे सेवन करा. 15 दिवसात लाभ दिसून येईल.
 
4. 1 अंजीर आणि दोन बदाम रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी याचे सेवन करा. निश्चित लाभ होईल.
 
5. नाचणीचं एका आठवड्यात एकदा कोणत्याही रूपात सेवन करा. खीर, शिरा किंवा कशा प्रकारेही या द्वारे कॅल्शियमची कमी पूर्ण करता येईल.
 
6. दिवसातून एकदा तरी लिंबू पाणी प्यावे.
 
7. अंकुरलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळतं. आपण अंकुरित आहार घेऊ शकत नसला तर आठवड्यातून एकदा सोयाबीनचे सेवन करू शकता.