मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जुलै 2019 (14:42 IST)

हेल्थ टिप्स: मश्रुममध्ये लपले आहे पोषणाचा खजिना, जाणून घ्या याचे फायदे

जर भाज्यांची गोष्ट करण्यात आली तर मश्रुम फारच लोकप्रिय भाजी आहे, जी मुलांपासून वृद्धांच्या आवडीची भाजी आहे. यात इतर भाज्यांच्या तुलनेत अधिक पोषक तत्त्व आढळून आले आहे. मश्रुममध्ये लाइसिन नावाचा अमीनो आम्ल अधिक मात्रेत असत, जेव्हा की गहू, तांदूळ इत्यादी धान्यात याची मात्रा फारच कमी असते. हा अमीनो आम्ल मनुष्याला संतुलित भोजनासाठी आवश्यक असतो. मश्रुममध्ये उपस्थित एंटी ऑक्सीडेंट आमचा फ्री रेडिकल्सपासून बचाव करतो. हे एक प्राकृतिक एंटीबायोटिक आहे, जे माइक्रोबियल आणि इतर फंगल संक्रमणाला ठीक करतो.
 
मश्रुमचे फायदे
1. हे ब्लड प्रेशर सारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. जे लोक या आजारांपासून त्रस्त आहे, त्यांना मश्रुमचे सेवन आवश्यक करायला पाहिजे.
2. कार्बोहाइड्रेटची पर्याप्त मात्रा असल्यामुळे हे कब्ज, अपचन, अती अम्लीयतासमेत पोटाच्या विभिन्न विकारांना दूर करतो, तसेच शरीरात कोलेस्टरॉल आणि शर्कराच्या अवशोषणाला कमी करतो.  

3. मधुमेहाच्या रुग्णांना जे काही हवे असते ते सर्व मश्रुममध्ये उपस्थित आहे. यात व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर असत. यात फॅट, कार्बोहाइड्रेट आणि शुगर देखील राहत नाही, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी जीव घेण्यासारखे आहे. हे शरीरात इन्सुलिनचे निर्माण करतो.  
4. यात लीन प्रोटीन असत, जे वजन कमी करण्यास मदतगार ठरत. लठ्ठपणा कमी करणार्‍यांना प्रोटीन डायटवर कंट्रोल करण्यास सांगण्यात येत, ज्यासाठी मश्रुम सर्वात उत्तम पर्याय आहे.  
5. यात सोडियम सॉल्ट देखील नसतो, ज्यामुळे लठ्ठपणा, किडनी व हृदयघात रुग्णांसाठी आदर्श आहार आहे. हृदय रोग्यांसाठी कोलेस्टरॉल, वसा आणि सोडियम सॉल्ट सर्वात जास्त हानिकारक पदार्थ असतात.  
6. मश्रुममध्ये लोह घटक तसे तर कमी मात्रेत असतात, पण उपस्थित असल्यामुळे रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कायम राखतो. यात बहुमूल्य फॉलिक ऍसिडची उपलब्धता असते, जी फक्त मांसाहारी खाद्य पदार्थांपासून प्राप्त होते. लोह घटक आणि फॉलिक ऍसिडमुळे हे रक्ताचा अभाव असणार्‍या ग्रामीण महिला आणि मुलांसाठी सर्वोत्तम आहार आहे.