शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (08:55 IST)

Obesity due to salad सलॅडने वाढू शकतं वजन!

salad tips
Obesity due to salad आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण डायटिंग करत असाल आणि त्यासाठी सलॅडचे अधिक सेवन करत असाल तर सावध व्हा. कारण सॅलडनेही वजन वाढू शकतं. हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे.
 
तशी ही गोष्ट सर्व प्रकाराच्या सलॅडवर लागू होत नाही, परंतू अनेकदा आपण स्वादिष्ट आणि चटपटीत सलॅडचा मजा घेण्याच्या फिराकीत वजन वाढवता.
 
बाहेर जेवायला गेल्यावर आपण आपल्या आवडीचे मेयोनीज आणि क्रीमने भरपूर सलॅडची चव बघता आणि व्हेज सिझलरच्या नावावर भरपूर सॉसही सेवन करता. परंतू या प्रकाराचे सलॅड कॅलरीने भरपूर असतात आणि वजन कमी करण्याऐवजी वाढवू शकतात.
 
याव्यतिरिक्त अनेक रेस्टॉरन्टध्ये सर्व्ह करण्यात येणार्‍या सलॅडची गार्निशिंगमध्ये असे पदार्थ वापरले जातात जे कॅलरीने भरपूर असतात आणि चव देण्यासह सपाट्याने आपले वजन वाढवण्यात हातभार लावतात.
 
म्हणून सलॅडचे सेवन करताना ते फ्रेश, आणि विना कॅलरीयुक्त असावे याची काळजी घ्या.