शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (16:57 IST)

हिवाळ्यात या गोष्टींचे सेवन अजिबात करू नका त्रास संभवतात

हिवाळ्यात कोणाला सर्दी-पडसं होणार नाही असे क्वचितच ऐकायला मिळते. या हंगामात सर्वात जास्त ही समस्या लोकांमध्ये आढळते जी त्रासदायी असते. अशा परिस्थितीत औषधे घेतली जातात,जेणे करून आराम मिळावा. आपणास माहित आहे का, की सर्दी पडसं होण्यामागील खरोखरच हा हवामानातील बदलच कारणीभूत असतो का ? की ह्यामागील कारण इतर काही आहे. आम्ही सांगत आहोत त्या गोष्टींबद्दल ज्यामुळे सर्दी-पडसं होऊ शकत. 
 
खरं तर बदलत्या हवामानामुळे सर्दी पडसं होतो, पण आपण जे काही खातो त्यामुळे देखील सर्दी-पडसं होऊ शकत. जसे की दूध, जरी दूध आपली हाडे बळकट करण्याचे काम करतो तरी सर्दी पडसं किंवा खोकला आहे, तर दुधाचे सेवन आपल्या त्रासाला वाढवतो. असं ह्या मुळे कारण डेयरीच्या पदार्थांमुळे शरीरात कफ बनतो म्हणून दूध पिण्याचा सल्ला तेव्हा दिला जातो, ज्यावेळी सर्दी-पडसं नसेल.
 
सर्दी पडसं असल्यावर तळलेले जंक-फूडचे सेवन करीत असाल तर या मुळे आपले त्रास वाढतात. आइसक्रीम, बर्गर, केक, बिस्किट या गोष्टींपासून लांब राहणेच योग्य आहे, कारण या जंक-फूड मध्ये असलेले तेल कफ बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.ह्या तेलाच्या सेवन केल्याने शरीरातील चरबी देखील वाढू शकते. तसेच नाकातून पाणी गळण्याचे कारण तिखट आणि मसालेयुक्त पदार्थांचे सेवन देखील असू शकतात.
 
आजच्या काळात शरीरात प्रतिकारक प्रणाली बळकट होणं महत्त्वाचे आहे, कारण जर प्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर आपण कोरोना विषाणू सारख्या बऱ्याच गंभीर आजाराला बळी पडू शकता. म्हणून जर जास्त प्रमाणात साखर घेत आहात,तर हे हानिकारक होऊ शकत. 
साखर शरीरात सूज येण्याला कारणीभूत असू शकते.जास्त प्रमाणात साखर घेतल्यानं प्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि सर्दी-पडसं चे त्रासाला जास्त वाढवते.  
 
मद्याचे सेवन करत आहात, तर या मुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमकुवत होतात,ज्या मुळे रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून ह्याचे सेवन करणे टाळावे. चहा, कॉफी आणि कोल्डड्रिंक मध्ये कॅफिन आढळते, हे घशात जाड कफ बनविण्याचे काम करतो. म्हणून ज्या वेळी सर्दी-पडसं होतो, तेव्हा ज्या पदार्थांमध्ये कॅफिन आहे ते पदार्थ न घेण्याचा सल्ला दिला जातो.