कोरोना लग्न Just for Fun
मुलीची आई - अहो....हे कुठले फालतू मास्क आणलेत?
मुलीच्या सासूला आणि सासर्याना तरी N- 95 द्यायला नको का?
नणंदा मावशी मामी आणि काकवाना 3ply
आणि त्यांच्या नवर्याना cotton mask चालतील.
इतर लोकाना ते use and throw वाले पण चालतील. नाहीतरी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाहीये. तेव्हा बराच खर्च वाचणार आहे. तर जावईबापू ना एक ppe kit पण देऊया. उगाच नाव ठेवायला जागा नको.
आणि आपल्या लाडक्या लेकीला daily wear साठी चांगले cotton mask पाहिजेत ते आम्ही दोघी घेऊन येऊ. ओटीसाठी designer mask जाऊ बाई शीवणार आहेत
मुलीचे बाबा - फक्त mask चं काय बोलत बसलीस? Sanitizer चं काय? Hall च्या दारात एक 5 lit वाला ठेवावा लागेल. तो सुद्धा automatic. शिवाय भटजीना पण द्यायला लागणार आहे. त्यानी सांगितलय तस.
मुलीची आई- अग बाई हो. मी विसरलेच होते. ओटीत पण द्यायला हवा एक एक. पण एवढे सगळे सामान available होइल ना?
मुलीचे बाबा- अग हो. मी सांगून ठेवलय आपल्या नेहमीच्या chemist ला. Arsenic album आणि च्यवनप्राश पण सांगितलय. चांगले 1 kg चे pack सांगितलेत. एवढच नाही तर वर्हाडी लोकांसाठी Vit C च्या गोळ्या पण. वाटल काय तूला. एकुलती एक मुलगी आहे आपली.