रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (12:37 IST)

"मी श्रावणात घेत नाही"

beer
देशपांडे साहेब रोज एका बार मध्ये जातात आणि तीन ग्लास बिअर मागवतात.
आणि त्या तीनही ग्लास मधून एक एक सिप घेत संपवत असत.
एक दिवस वेटरला राहवले नाही म्हणून त्यानी विचारले की
साहेब तुम्ही एका ग्लास मधून सुद्धा पिऊ शकता तीन ग्लास कशाला?
देशपांडे साहेब उदास होऊन सांगतात
अरे आम्ही लहानपणापासूनचे तीन मित्र आहेत आणि आम्ही एकत्र बसायचो परंतु आता ते परदेशात आहेत म्हणून त्यांचे दोन ग्लास सुद्धा मीच पितो म्हणजे ते जवळ असल्यासारखे वाटते.
 
काही महिन्यानंतर एक दिवस देशपांडे साहेबांनी दोन ग्लास मागवले आणि प्यायला सुरुवात केली.
वेटरला वाटलं ह्यांचा एक मित्र गेला वाटतं. त्यानी विचारले 
साहेब तुमच्या एका मित्राला काही झाले का?
देशपांडे: नाही रे माझे दोन्ही मित्र एकदम व्यवस्थित आहेत.
"मी श्रावणात घेत नाही" 
ह्याला म्हणतात खरी मैत्री