शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी

१.  आंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. 
( तहान लागल्यावर विहीर खोदणे )
 
२. कोकणातला शेजारी आंबा विकत घेईल काय ???
( पिकते तिथे विकत नाही. सानुनासिक आवाजात वाचावे )
 
३. पिकल्या आंब्याला घमघमाट फार.
( उथळ पाण्याला खळखळाट फार )
 
४. आमरसाची तहान पन्ह्यावर.
( दुधाची तहान ताकावर )
 
५. औषधाला आंबा नाही पण नाव आंबेगाव
(अक्कल नाही काडीची पण नाव सहस्रबुद्धे)
 
६. अती पिकला आणि खराब झाला.
( अती केलं वाया गेलं )
 
७. लहान कोय मोठे फळ
 ( आखुड शिंगी बहुदुधी )
८. आपले आंबा खाणे ती आवड दुसऱ्याचा तो हावरटपणा 
( आपले ते प्रेम दुसऱ्याचे लफडे )
 
९. आपला तो देवगड दुसऱ्याचा पायरी 
(आपला तो बाळ्या दुसऱ्याचे कार्टे)
 
१०. आमरस घेतला करायला आंबा नाही पिळायला
(आले मी नांदायला मडके नाही रांधायला)
 
११. आपलीच साल आपलीच कोय 
(आपलेच दात आपलेच ओठ)
 
१२. आपला सडका दिसत नाही दुसऱ्याचा लागलेला दिसतो. 
(आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते)
 
१३. नावडतीचा आमरस आंबट 
(नावडतीचे मीठ अळणी)
 
१४. कुठेही जा आंब्याला कोय एकच
(पळसाला पाने तीन)
 
१५. खा आंबा हो जाडा.
( पी हळद हो गोरी )
 
१६. आंब्याचा सिझन तीन महिने.
(तेरड्याचा रंग तीन दिवस)
 
१७. शेजारच्याकडून फुकट आला तरी पाटीभर आंबा खाऊ नये 
(उस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये)