शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (10:04 IST)

वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!

whats app message
एक दारुडा रोज रात्री दारुच्या गुत्यावरनं घरी जाताना वाटेत एक शंकराचं देऊळ होतं तिथं बाहेर रस्त्यावरच चपला काढून नमस्कार करायचा आणि निघून जायचा....
 
असं रोज न चुकता दोन चार महिने चालू असतं.
पुजारी मनात म्हणतो की हा खरंच श्रद्धेने नमस्कार करतो की दारुच्या नशेत नमस्कार करतो...?
म्हणून पुजारी एक दिवशी ती शंकराची मूर्ती काढून तिथं गणपतीची मूर्ती ठेवतो....
आणि संध्याकाळी त्या दारूड्याची वाट पहात बसतो.
दारुडा येतो, नेहमीप्रमाणेच नमस्कार करतो आणि जायला लागतो.
दोन पावलं पुढं गेल्यावर परत मागे येतो.
आणि गणपतीकडं बघून म्हणतो....
.
.
"वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!
पुजारी येडं होउन फीरतय...
दारूड्याचा नाद नाय करायचा  .....