सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By वेबदुनिया|

मकर राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

WD

राश्याधिपती शनीचे वर्षभर दशमस्थानातील वास्तव्य, मंगळाचे दीर्घकाळ भाग्य आणि दशमस्थानातील भ्रमण हे दोन्ही तुम्हाला चांगले आहे. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवून आपले स्थान स्थिर करण्यास तुम्हाला कितीही कष्ट पडले तरी तुम्ही मागेपुढे पाहात नाही. हा तुमचा गुण वाखाणण्यासारखा आहे. यंदाच्या वर्षी गुरू तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे, तसेच इतरही महत्त्वाचे ग्रह साथ देणार आहेत. जूननंतर एखादी नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरेल.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....


धंदा, व्यवसाय व नोकरी

WD


व्यापार-उद्योगात कामाचा पसारा आणि उत्पन्न वाढविणे याचा ध्यास लागेल, पण त्यातील यश स्पर्धकांच्या चालींवर अवलंबून असेल. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पैसे किंवा गुंतवणूक करावी लागेल. त्याचा उपयोग फेब्रुवारीपूर्वी आणि ऑगस्टनंतर होईल. जादा पैशाच्या मोहाने अयोग्य व्यक्तींशी संगत करून नका आणि बेकायदेशीर कामांपासून लांब रहा. नोकरीत अपेक्षित कामे होतील. पगारवाढ, बढतीची शक्यता आहे. जुनी आर्थिक येणी वसूल होतील.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....

गृहसौख्य व आरोग्यमान

WD

कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने वर्ष संमिश्र आहे. जूनपर्यंत तुमच्याच कामाच्या व्यवधानामुळे तुम्ही सांसारिक जीवनाला म्हणावा तसा न्याय देऊ शकणार नाही. जूननंतर गुरू सप्तमस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर पुढील दिवाळीपर्यंत तुम्ही खर्‍या अर्थाने गृहसौख्याचा आस्वाद घेऊ शकाल. या दरम्यान घरात नवीन बालकाचे आगमन होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची कुरबूर राहील. मुलांकडून सुर्वाता कळेल. एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन राहील. आर्थिक चिंता मिटेल. मकर रास ही चर गुणधर्माची, पृथ्वी तत्त्वाची आहे. तिचा अधिपती शनी आहे व चिन्ह मकर आहे. शुभरंग पोपटी, फिकट हिरवा, शुभरत्न नीलम व आराध्य दैवत शनी, मारुती आहे.