शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2014
Written By वेबदुनिया|

साप्ताहिक भविष्यफल (02 मार्च ते 08 मार्च 2014)

WD

मेष : नवीन व्यावसायिक करार घडतील.प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. नवनवीन कल्पना आकार घेतील. आपल्या राशीतून गुरु, शुक्राचे तर दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल.

वृषभ : रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल.भविष्यकाळाच्याददृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल.

मिथुन : अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील. नवीन जबाबदार्‍या तूर्त टाळाव्यात. मन सैरभैर होईल. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे गेल.संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे.

कर्क : महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. जनसंपर्कातून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. शुभदिनांक १८, १९.

सिंह : नव्या उमेदीने कामाला लागाल. प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जुने मित्र भेटतील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या अनिश्‍चितता जाणवेल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.

कन्या : व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जुने मित्र भेटतील. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा.

तुळ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आगंतुक पाहुणे येण्याची शक्यता राहते. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल.

वृश्चिक : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना भावंडांशी सल्लामसलत कराल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील.

धनु : प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. नवीन कल्पना आकार घेतील. सतत शुभशकुनांचा सतत प्रत्यय येईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांना यश देईल. जूनी येणी वसूल होतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल.

मकर : आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. समाधान लाभेल. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी लाभतील.

कुंभ : उत्तरार्धात कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने नवीन प्रकल्प राबविण्यात यश येईल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका.

मीन : नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. आनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. सरकारी वास्तू व वाहनाचे योग येतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकीक वाढेल. आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर मोठी मजल माराल. नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.