शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By
Last Updated : मंगळवार, 13 जानेवारी 2015 (16:30 IST)

अंक ज्योतिषच्या एका उपायाने टिकवा तुमची सुंदरता दीर्घकाळापर्यंत

तुमची जन्म तारीख तुमचा मूलक आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मूलकांच्या आधारावर जाणून घ्या सुंदर आणि यंग दिसण्याचे रहस्य.  
 
मूलक 1 असेल तर तुम्हाला या नॅचरल वस्तूंचा वापर करायला पाहिजे.  
आलं, लवंग, केशर, मनुका, काळेमिरे, ओवा, लिंबू, जायफळ, खजूर, संत्री, सीताफळ इत्यादींचा वापर केल्याने सुंदरतेच वाढ होते. 
 
मूलक 2 असल्यास करा या नॅचरल वस्तूंचे वापर करा  
दीर्घकाळापर्यंत युवा बनून राहण्यासाठी तुमच्या अंकानुसार केळी, काकडी, पत्ता कोबी , सिंघाड़ा, सलाड इत्यादी वस्तूंचे सेवन केल्याने फायदा होतो.    
   
मूलक 3 असल्यावर या नॅचरल वस्तूंचा वापर करावा  
डाळिंब, द्राक्ष, अननस, शहतूत, सफरचंद, नाशपाती, पुदिना, बदाम, केशर, लवंग, अंजीर व शलजमचा वापर करावा. शतावर ही एक जडी-बुटी आहे, ज्याचे सेवन दुधासोबत केल्याने तुमच्यात अश्वासारखी ताकद येते.

मूलक 4 असल्यास करा या नॅचरल वस्तूंचा प्रयोग  
पालक, मेथी, सॅलाड, कांदा, पाल्या भाज्या, कारले, निम, गोड फळं इत्यादींचा प्रयोग केल्याने सुंदरतेत वाढ होते. तसेच दीर्घकाळापर्यंत तुमचे यौवन कायम राहण्यास मदत मिळते.     
 
मूलक 5 असल्यास करा या नॅचरल वस्तूंचा वापर  
बदाम, अक्रोड आणि नारळाचा गर, शलजम आणि जवसाच्या पोळ्यांचे सेवन. बदाम आणि अक्रोडाचे सेवन विशेष लाभकारक असते.  
मूलक 6 असल्यावर करा या नॅचरल वस्तूंचे वापर 
बदामाचे सेवन करा. डाळिंब, अंजीर, अक्रोड सर्व प्रकारच्या शेंगा, शलजम, टरबूज, नाशपाती, सफरचंद इत्यादीचे सेवन आपल्या आहारात  आवश्यक केले पाहिजे.
मूलक 7 असल्यास या नॅचरल वस्तूंचा वापर करावा  
प्रत्येक फळांचा रस लाभदायक असतो. काकडी, कांदा, टोमॅटो, मुळा, लिंबू इत्यादीचे सेवन सॅलड, सेब, संत्रं, कोबी व द्राक्षाचे सेवन केल्यानं तणाव व चिंता कमी राहते. 
   
मूलक 8 असल्यास या नॅचरल वस्तूंचा वापर करावा  
अशा लोकांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे त्याने त्यांचे यौवन कायम राहते. या लोकांसाठी  कोथिंबीर, पुदिना, लसूण, कांदा, पालक, गाजर व केळी स्वास्थ्यरक्षक असतो.  
 
मूलक 9 असल्यास या नॅचरल वस्तूंचे सेवन केले पाहिजे  
गोड फळांना आपल्या आहारात विशेषकरून सामील कले पाहिजे. दीर्घकाळापर्यंत यंग दिसण्यासाठी आलं, लसूण, कांदा, लाल व हिरवी मिरची, काळ्यामिर्‍याचा वापर केला पाहिजे.