रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2015
Written By
Last Updated : मंगळवार, 30 डिसेंबर 2014 (13:06 IST)

सिंह राशीच्या जातकांचे 2015मधील वार्षिक राशिभविष्यफल

सिंह राशीच्या जातकांचे वर्ष 2015 मध्ये संमिश्र फळ देणारे ग्रहमान लाभेल, त्यामुळे आशा-निराशेचा खेळ चालू राहील. आता शनी राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. गुरुचे भ्रमण जुलैपर्यंत व्ययस्‍थानात राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची इच्छा नसूनही तुमच्या महत्तवाकांक्षेला मुरड घालवी लागेल. पण गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ थोडासा उतार-चढावांचा असेल. 
 
वैतागून जाऊ नका, हा तुमच्या क्षमता तपासण्याचा काळ आहे. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तुलनेने वर्षाचा उत्तरार्ध अधिक चांगला दिसून येत आहे. 2015 सालातील सिंह राशीच्या कुंडलीनुसार या काळात स्थिर आणि शांत राहिलेले योग्य राहील. तुमच्या अचूनक योजनेमुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल. तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. एकूणच या वर्षी अनेक औत्सुक्यपूर्ण घटना घडतील. 2015 या वर्षाच पुरेपूर वापर करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध लागेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित एक असामान्य व्यक्ती होऊ शकाल. 
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापार -उद्योगात तुमच्या जिद्दी स्वभावानुसार काही मोठे प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतले असतील. त्याला वेग देण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल, परंतु ज्या व्यक्तीकडून जशी साथ तुम्हाला अपेक्षित आहे तशी ती न मिळाल्यामुळे तुमची धावपळ उडेल. फेब्रुवारी 2015 पर्यंत फारशी उलाढाल होणार नाही, तरी गरजेनुसार कामाचे पैसे मिळतील. मार्च 2015 मध्ये एखादी चांगली घटना घडेल व कामात होणारे बदल अनुकूल ठरल्याने तुम्हाला स्फूर्ती मिळेल. एप्रिल ते जुलै हा कालावधी आर्थिकदृष्टया विशेष लाभदायी ठरेल. जुनी देणी देऊन नवीन गुंतवणूक करू शकाल. आर्थिक प्राप्ती चांगली झाल्याने खूश असाल. जुलैमध्ये गुरू तुमच्याच राशीमध्ये येईल. त्यानंतर बढतीचे योग संभवतात. जी संधी पूर्वी गमावलेली होती ती नजरेच्या टप्प्यात आल्यामुळे तुम्ही सतर्क बनाल. पुढील दिवाळीपर्यंत भरपूर काम करून त्याचे श्रेय मिळेल. 
 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान... 

गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनामध्ये नवीन वर्ष थोडे खर्चाचे व तणावाचे राहील, तेव्हा अतिविचार करू नका. 
 
येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्यासाठी सिद्ध व्हा. मे जून पासून तुमच्या इच्छा- आकांक्षा फलद्रुप होण्याची खात्री वाटू लागेल. एखादी शुभ घटना जुलैनंतर ठरून त्याची कार्यवाही ताबडतोब करण्याचा इरादा असेल. घरातील सदस्यांचे प्रश्न हलके झाल्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. वृद्धांनी कर्तव्यतत्पर राहावे. प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका. महिला व गृहिणींनी कर्तव्यदक्ष राहून सर्व आघाड्यांवर यशस्वी घोडदौड करावी, हे करताना स्वत:चा आवाका लक्षात ठेवावा. 
 
तरुणांनी कष्टामध्ये कसून करून चालणार नाही. तुमचा संयम आणि चिकाटी याचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. असा आत्मविश्वास बाळगा. परदेशात जाणर्‍या विद्यार्थ्यांना जुलैनंतरचा कालावधी चांगला आहे. 
 
शुभ रंग : निळा    
शुभरत्न : हिरा   
आराध्यदैवत : देवी    
उपाय: गायीला दूधभात खाऊ घाला.