आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे
न जाणे ते दिवस कुठं हरवले,
आजोळी जायला पाय विसरूनच गेले,
वाट ती सरळ होती, अवचित नागमोडी झाली,
आज आज पर्यंत जे होतं, एक कहाणी झाली,
हळूहळू च झालेत सगळे बदल, स्वीकारले,
परका झाला आजोळचा गाव,सत्यात उतरले,
असोत, पण आठवणी ही तितक्याच रम्य आहे,
आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे.
..अश्विनी थत्ते