गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (20:20 IST)

Kabir Das Jayanti 2020 : संत कबीर दासांच्या संयमाची रोचक कथा

एका शहरात एक विणकर राहत होता. तो स्वभावाने खूप शांत, नम्र, आणि निष्ठावान होता. त्याला कधी राग येत नसे. एकदा काही मुलांनी खट्याळपणाने त्याला त्रास द्यायचे ठरविले. ते सर्व या विचारात गेले की बघू हा चिडत कसं नाही ? 
 
त्यापैकी एक मुलगा श्रीमंत पालकांचा मुलगा होता. तिथे गेल्यावर त्याने विचारले की ही साडी कितीला आहे? विणकर म्हणाला - 10 रुपये. 
 
मग मुलाने त्या साडीचे दोन भाग केले आणि म्हणाला की मला ही पूर्ण साडी नकोय मला अर्धीच हवी आहेत ह्याचे किती पैसे घेणार? विणकराने शांतपणे उत्तर दिले 5 रुपये. 
 
त्या मुलाने त्याचे देखील दोन भाग केले आणि त्याची किंमत विचारली ? त्यांनी शांतपणे अडीच रुपये किंमत सांगितली. तो मुलगा तसेच साडीचे तुकडे करत गेला. शेवटी म्हणाला की आता मला ही साडी नको ही माझ्या काहीच कामाची नाही. हे तुकडे मला कसले कामाचे? 
 
विणकराने शांत पणे उत्तर दिले की बाळ ! हे तुकडे आता तर तुझाच काय अजून कोणाच्याही उपयोगी नाही. आता त्या मुलाला लाज वाटली तो म्हणाला की मी आपले नुकसान केले आहे. मी आपल्या त्या साडीची किंमत देतो.
 
विणकर म्हणाला की जेव्हा आपण साडी घेतलीच नाही तर त्याची किंमत मी आपल्याकडून कशी काय घेऊ ? 
 
त्या मुलाचा स्वाभिमान जागा झाला तो म्हणाला की मी फार श्रीमंत आहे. आपण गरीब आहात मी आपल्याला पैसे दिले तर मला काहीही हरकत नाही. पण आपण हे नुकसान कसं काय सहन कराल? आपले नुकसान मी केले आहेत. तर त्या झालेल्या नुकसानाची भरपाई तर मला करावीच लागणार.
 
विणकर म्हणाला की त्या झालेल्या नुकसानाची भरपाई आपण करू शकणारच नाही. विचार करा की शेतकऱ्याने यासाठी किती कष्ट घेतले आहेत मग कापूस लावला. माझ्या बायकोने खूप कष्ट घेऊन त्या कापसाला बनवून सूत विणले. मग मी त्याला रंगले आणि विणले. ही केलेली मेहनत त्यावेळी कामी आली असती जेव्हा त्या कापड्याला कोणी घातले असते. पण आपण तर त्या कापड्याचे फार तुकडे केले. आपल्या त्या पैशांनी हे झालेले नुकसान कसं काय भरून निघणार. 
 
विणकराचा आवाज रागाच्या ऐवजी शांतता आणि सौजन्यता होती. त्या मुलाला फार लाजिरवाणी गोष्ट वाटू लागले. त्याचे डोळे पाणावले. तो त्या विणकराच्या पाया पडला. विणकराने त्याचा पाठीवर मायेचा हात फिरवून त्याला आपल्या जवळ घेऊन म्हटले -
 
बाळ, मी जर का पैसे घेतले असते तर माझे काम झाले असते पण आपल्या आयुष्याचे पण त्या कापड्यासारखेच झाले असते. त्याचा काहीही उपयोग झाला नसता. एक साडी गेली तर मला दुसरी बनवता येऊ शकते पण जर का आपले आयुष्य अहंकाराने नष्ट झाले असते तर परत कसं काय मिळवणार ? आपण केलेले पश्चात्तापच माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
 
शिक्षा : संतांच्या उच्च विचारसरणीमुळे मुलाचे आयुष्य बदलले. हे संत अजून कोणी दुसरे नसून संत कबीर दासजी होय.