रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (13:54 IST)

ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये काय फरक आहे?

ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस यात काय फरक आहे? खरं तर, ब्राऊन राईस सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. याने त्यातील पोषक घटक संपूर्ण धान्यांसारखेच असतात. पांढर्‍या तांदळाची साली काढून पॉलिश केलं जातं. तांदूळ मध्ये उपस्थित अनेक पोषक या प्रक्रियेदरम्यान कमी होते. 
 
आपल्या देशात ब्राऊन राईस शिजवण्यासाठी लागणारी वेळ तसंच चवमुळे लोकांना पसंत पडत नाही परंतु याचं जीआई (ग्लाइसेमिक इंडेक्स) कमी असल्यामुळे हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. पूर्वी याचा साठा करुन ठेवणे देखील अवघड प्रक्रिया होती मात्र आता बेहतर तकनीकीने तांदुळ जास्त काळ ठेवला जाऊ शकतो.

ब्राऊन राईस खाण्याचे फायदे
- लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं.
- मधुमेहाचा धोका कमी करतो.
- हाडांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करतं.
- पोटाशी संबंधित विकार रोखण्यास मदत करतं.
- जीआय कमी असल्यामुळे पोटं भरल्यासारखं वाटतं
- जास्त फायबर असल्याने पोट त्वरीत भरतं.
- अँटिऑक्सिडंट्स ताण आणि रोग टाळण्यास मदत करतात.