शनिवार, 19 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (16:42 IST)

जाळीदार आणि कुरकुरीत, तव्याला न चिकटणारा डोसा बनवण्याची ट्रिक अवलंबवा

डोसा हा साउथ इंडियन डिश आहे. पण भारतात डोसा ही प्रत्येकाची आवडती डिश आहे. डोसा नाश्ता, लंच, डिनर मध्ये देखील अनेक जण पसंद करतात. पण अनेकांची समस्या असते की, डोसा तव्यावर चिकटतो किंवा फाटतो किंवा जाड टाकला जातो. हे असे होऊ नये या करीत आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहोत.तर चला जाणून घ्या.  
 
डोसा बॅटर कसे तयार करावे?
डोसा बॅटर कधीही एक तर पातळ करून नये किंवा घट्ट करू नये. यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिक्स करावे.  
 
डोसा बनवण्यासाठी योग्य तवा-
जर तवा व्यवस्थित तयार नसेल तर डोसा नक्कीच तव्याला चिकटतो. केव्हाही कास्ट आयर्न तवा वापरावा. तसेच डोसा बनवण्यापूर्वी तव्याला ग्रीस करावे. सर्वप्रथम तवा चांगला गरम करून मग त्यावर तेल टाकून ग्रीस करावे यानंतर ओल्या टॉवेलने तेल स्वच्छ करा.  
 
तवा थंड होऊ द्या-
डोसा पसरवताना तवा कधीही जास्त गरम नसावा. जर तवा खूप गरम झाला तर डोसा नीट पसरत नाही व चिकटूनही जाईल. याकरिता तवा थंड करण्यासाठी पाणी शिंपडा. मग डोसा पसरवावा. तसेच तुम्ही साधा डोसा बनवत असाल तर, डोसा टाकण्यापूर्वी त्यावर तव्यावर थोडे तूप घालावे. यामुळे डोसा कुरकुरीत होऊन चव देखील चांगली येते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik