गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (16:35 IST)

चहा पावडर मध्ये भेसळ आहे का नाही?ओळखण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. तसेच आता चहा पावडरमध्ये देखील भेसळ करण्यात येत असल्याने चहा घेतल्यानंतर पाचन संबंधित समस्या, एलर्जी यांचा धोका वाढत आहे. याकरिता आज आपण अशाकाही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे चहा पावडर मधील भेसळ नक्कीच ओळखता येईल. तर चला जाणून घेऊ या. 
 
कलर टेस्ट-
चहा पावडरची शुद्धता ओळखण्यासाठी कलर टेस्ट हा एक सोप्पा पर्याय आहे.याकरिता एक पारदर्शक ग्लास घ्यावा त्यामध्ये लिंबाचा रस आणि चहा पावडर घालावी. काही वेळा नंतर लिंबाचा रस हिरवा पिवळा झाल्यास समाजा की चहा पावडर भेसळमुक्त आहे. जर चहा पावडरचा रंग नारंगी किंवा दुसरा कोणताही कलर आला तर समजावे की, चहा पावडर भेसळयुक्त आहे. 
 
टिश्यू पेपर टेस्ट-
दोन चमचे चहा पावडर टिश्यू पेपर वर ठेऊन त्यावर पाणी शिंपडावे, मग हा टिश्यू पेपर उन्हात ठेवावा. जर टिश्यू पेपर वर रंगीत डाग लागले तर त्या चहा पावडरमध्ये भेसळ आहे. भेसळमुक्त चहा पावडरने टिश्यू पेपरचा रंग बदलणार नाही. 
 
कोल्ड वॉटर टेस्ट-
एका ग्लासात थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे चहा पावडर घालावी. चहा पावडर असली असल्यास हळू हळू रंग सोडेल. व रंग घट्ट होईल. पण जर चहा पावडर भेसळयुक्त असले तर चहा पावडरचा रंग लागलीच बदलेल. हा सोप्पा उपाय आहे जो तुम्ही घरी देखील करू शकतात.
 
सुगंधाची टेस्ट-
भेसळमुक्त चहा पावडरचा सुगंध तुम्हाला लागलीच सांगेल की चहा पावडर भेसळमुक्त आहे. पण जर तुम्हाला चहा पावडरमध्ये आर्टिफिशियल किंवा केमिकलयुक्त सुगंध येत असेल तर समजून जा की, चहा पावडर भेसळयुक्त आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik