शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमाची गोष्ट
Written By वेबदुनिया|

रोहिणीचा पाऊस : तू अन् मी

WD
'आता निघायला पाहिजे काय भीतीयुक्त वातावरण झालाय, मला जीवाची काळजी वाटायला लागली. चल, हे भयावह काळेकुट्ट मेघ विनाधास्तीने बरसतील. निसर्गाने आमच्या भरणाची पूर्ण तयारीच केलेली दिसते. काळ्यकुट्ट मेघातून ठोकवणारी अग्नी आमचाच निशाणा घेत आहे. चल, इथ राहणं योग्य नाही. हे माझ्या सखीचे वाक्य किती हास्यास्पद आहे? पहिल्या पावसात चिंब भिजून या निसर्गलीला उघड्या डोळ्याने बघता याव्यात, ही माझी मनिषा. रोहिणीचा पाऊस कसा कल्याणकारी पर्व निर्माण करते, माहित आहे तुला? रोहिणीचा पाऊस आपल्या प्रणयाच्या भावना त्याच्या ओल्या स्पर्शाने, मातीच्या सुगंधाबरोबर अधिकच तीव्र होण्याचे संकेत देतो आहे, हे तुला का कळत नाही? इतके विद्रोहाचे वातावरण आपल्याला संपविण्यासाठी नाही, तर येणार्‍या संकटाचा सामना कसा करावा हे सांगतो आहे. या ओढ्याच्या पा‍त्रात आपले पाय डुंबण्यापर्यंत रोहिणीचा पाऊस झेलतच राहू. जेणेकरून पाऊस स्वत:च आपल्याला शरण जाईल. एग आगळी वेगळी 'आमची प्रेमकथा' दुसर्‍या मुलखात जाऊन सांगोन. आणि या विजेला घारबण्याचे कारण नाही. कारण तिला माहित आहे, ही प्रेम जोडी निसर्गाने तयार केली आहे. अशी प्रेमजोडी तिने कुठेही बघितली नाही. त्यामुळे ती आपला फोटो काढत आहे, ते तू का समजून घेत नाहीस.

अंग, आजचे हे निसर्गाचे तांडवनृत्य आपल्यासाठीच आहे. असा योगयायोग कधीच साधून येत नाही.

आज हे थांबणार नाही. या पहिल्या पावसातच तर दडलेल्या नवीन विजांना अंकूर फुटतो. पाऊस आणि माती यांचही नातं आपल्यासारखंच आहे. म्हणूनच तर आजही त्यांचं नातं अतूट आहे.

डेनिस वासनिक