सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

बायका नवर्‍यापासून लपवतात या 5 गोष्टी

स्त्रियांना समजणे कठिण आहे हे तर सर्वांना माहीत आहे. त्यांच्या पोटात काही लपून राहत नाही हे पण माहीत असेल पण नवर्‍यापासून काही लपवायचं असल्यास ही गोष्ट अपवाद ठरते. पाहू अश्या कोणत्या गोष्टी आहे ज्या बायका आपल्या नवर्‍यापसून लपवतात. 
1. मैत्रीणीला सर्व माहीत आहे: हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे की बायका आपल्या मैत्रिणींशी आपल्या रिलेशनबद्दल सर्व शेअर करतात, अगदी बेडरूममधल्या नवर्‍याच्या परफॉर्मेंसबद्दल सुद्धा. हो पण नवर्‍याने विचारलं तर त्या असे काही नाही असंच उत्तर देणार.

2. इतर पुरुषांसह संबंध: पत्नी आपल्या नवर्‍याला कधी कळून देत नाही की तिचं कुणाबरोबर संबंध होते. पण एखादं वेळी दारूच्या नशेत या गोष्टी चुकीने शेअर केल्या गेल्या तर ती बाब वेगळी.
3. कुरूप अंग लपवणे: आपण एकमेकासोबत कितीही वेळ घालवला असेल तरी ती नेहमी अनवॅक्स जागा किंवा शरीरातील एखादे कुरूप अंग किंवा त्वचा लपवण्याचा प्रयत्न करते.

4. एक्सबद्दल विचार करणे, तुलना करणे: आपले संबंध कितीही मधुर असले तरी अधून-मधून आपल्या एक्सबद्दल विचार करत असते. विचारांमध्ये त्याची आणि आपली तुलनाही करते.
5. आकर्षित करण्याचा प्रयत्न: काही काळ गेल्यावर एकमेकापासून मोह भंग होता. संबंध मधुर राहतात तरी काही नवेपणा वाटत नाही तेव्हा ती आपल्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या आवडीप्रमाणे राहण्या, बोलण्या आणि वागण्याचा प्रयत्न करते.