मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (08:40 IST)

टीव्ही -इंटरनेटच्या अति वापरामुळे मुलांची भाषा बदलत आहे, असा सुधार करा

एखाद्या जोडप्या कडे मुलाचा जन्म होतो तर त्यांचा आनंदाला सीमाच नसते.ते आपल्या पाल्याचे संगोपन अतिशय लाडाने करतात.त्याला चांगले संस्कार देतात.जेणे करून तो एक चांगला माणूस बनू शकेल.परंतु सध्या कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद असल्यामुळे मुलांचा जास्त वेळ टीव्ही आणि मोबाईल समोर जात आहे.एकीकडे ते या पासून चांगलं काही शिकत आहे तर दुसरी कडे त्यांच्या व्यवहारात काही अशा गोष्टी बदल आणत आहे.बऱ्याच वेळा ते अशा काही गोष्टी या इंटरनेटवर बघतात ज्यामुळे त्यांची भाषा बदलून जाते जर आपल्या पाल्याबरोबर देखील असं काही झाले आहे तर काही टिप्स सांगत आहोत ज्या आपल्याला आपल्या पाल्याला सुधारण्यासाठी कामी येतील.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1  योग्य वेळी चुका सांगा- बरेच पालक आपल्या मुलांवर इतके प्रेम करतात की कधी कधी ते त्याच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करतात नंतर त्यांना समजते की त्यांच्या कडून मोठी चूक झालेली आहे.असं होऊ नये या साठी जेव्हा आपले पाल्य चुकीची भाषा बोलतात तर त्याच वेळी मुलांना  रागवा आणि त्यासाठी त्यांना समजवावे.त्यांच्या साठी काय चांगले आहे आणि काय वाईट आहे वेळीच सांगावे. 
 
 
2 त्यांना रागावू नये प्रेमाने समजवावे -बऱ्याच वेळा मुलं वाईट बोलतात किंवा वाईट वागतात या कारणास्तव मुलांना त्यांचे आई-वडील मारतात. असं करू नका,असं केल्याने त्याच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.म्हणून आपण आपल्या मुलांना प्रेमाने  चांगल्या आणि वाईट मध्ये फरक काय आहे समजावून  सांगा.असं केल्याने त्यांच्या मध्ये काही बदल घडू शकेल.
 
3 चांगल्या गोष्टी दाखवा-जेव्हा मुलं एकटा मोबाईल हाताळत असतो तेव्हा तो त्याच्या वर काहीही गोष्टी बघू शकतो.त्यात काही गोष्टी चांगल्या असतात तर काही वाईट असतात.म्हणून पालकांनी नेहमी आपल्या बरोबर बसवूनच चांगल्या गोष्टी,चांगले विचार असलेले चित्रपट,धार्मिक गोष्टी दाखवावे.असं केल्याने मुलांच्या व्यवहारात बदल होऊ शकतं.
 
4 मुलाला चांगल्या गोष्टी शिकवा- प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवाव्यात.जर आपले मुलं चुकीच्या भाषेचा  वापर करतात तर त्यांना असं करण्यासाठी थांबवा.त्याला मोठ्यांशी कसे वागावे,कसे बोलावे,हिळून मिसळून कसे राहावे,चूक काय आहे आणि काय बरोबर हे सांगावे जेणे करून तो चांगल्या गोष्टी शिकतील.