मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (13:59 IST)

उभा पृथ्वी वर "बहावा"थाटाने

सोनियाचा तरु लावीयला देवाने,
उभा पृथ्वी वर "बहावा"थाटाने,
झुलतात सोनेरी झुंबर मोठ्या ऐटीत,
ऊन्हात ही उजळून निघतो, करतो चकीत,
माळरानावर बघा त्यास कित्तीही दुरून,
पिवलेधम्म रूप त्याचे दिसते खूप उठून,
बहावा मिळवितो वाहवा सगळीकडून,
निसर्ग ही खुश आपली कलाकृती बघून,
चला मंडळी तुम्ही ही यावं बघून हे सूंदर रूप,
उन्हात ही उभा असून देखील, आनंदी व्हाल खुप !
अश्विनी थत्ते.