Uttarkashi Tunnel Tragedy : गर्द काळोखात, एका बोगद्यात
गर्द काळोखात, एका बोगद्यात,
अडकलेत बंधू आपले, सापडले संकटात,
परी ना खचली हिंमत त्यांची, आहेत धैर्यवान,
तळमळीने प्रयत्न चालले, ते करणारे ही महान,
यश मिळो हे देवा, अन बंधू माझे येवोत सुखरूप घरी,
त्यांचे कुटुंब ही आसुसले, राहिली करायची दिवाळी साजरी,
कष्टकरी आहेत सारे, कष्टच त्यांची सेवा,
शुभेच्छा अन प्रार्थना सर्वांच्या कामी येऊ दे गा देवा!
घेतील श्वास मोकळा, हे सुपुतभारताचे ,
काळजीपूर्वक बाहेर काढतील त्यांना, होईल सोने कष्टाचे!
..अश्विनी थत्ते.