गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

नियमित उपयोगी पडणार्‍या टिप्स

परफ्यूमची बाटली संपल्यावर टाकून न देता सील उघडून बाथरूममध्ये ठेवावी. यामुळे त्यांचा मंद सुंगध दरवळत राहतो. 
 
साबणाचे तुकडे उरले तर एखाद्या जाळीदार पिशवीत घालून बेसिनजवळ लटकवून ठेवावे. हात धुण्यासाठी त्याचा चांगला वापर होतो. 
 
कॉटन शूज किंवा कोणत्याही प्रकारची पादत्राणे ओली झाल्यास त्यात कागदाचे बोळे भरून ठेवावेत. 
 
संत्र्याच्या साली वाळवून अधूनमधून घरामध्ये जाळल्यास डासांचा त्रास कमी होतो.
 
सिगारेटच्या धुराचा वास घरामध्ये भरून राहू नये. यासाठी अँश ट्रेमध्ये थोडीशी बेकिंग पावडर ठेवावी. 
 
काकडीची सालं चांगली कुडकुडीत होईपर्यंत वाळवावी. आणि पुरचुंडी करून कपाटात ठेवावी. त्यामुळे झुरळ आणि मुंग्यांचा त्रास कमी होतो. 
 
टुथब्रश अधूनमधून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा. 
 
गरज नसल्यास घरातील लाईट-पंखे चालू ठेवू नये. तुम्ही ज्या रूममध्ये बसाल त्या रूमचाच लाईट पंखा बंद ठेवावी.