शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

साज शृंगारासह परंपरा जपण्याची आवड

gudi padwa
आजकाळ फॅशन म्हणजे वेगळं दिसण्याची ओढ आणि त्यासाठी केलेलं कोणत्याही प्रकाराचे आगळे वेगळे प्रयत्न. हे प्रयत्न आपण सुंदर दिसण्यासाठी करतो यात काहीच शंका नाही, पण आपला कंफर्ट नक्की बघावा आणि त्याचा फायदा होत नसला तरी नुकसान तर होत नाही हे सुनिश्चित करणे फार महत्वाचं आहे.
 
आपली पारंपरिक वेशभूषा म्हणजे महाराष्ट्रीयन पेहेराव पद्धती. जर आपण बघाल तर आपल्याला हे फार स्पष्ट कळेल की सुंदरता आणि कंफर्ट दोन्ही बघून आपण फॅशनेबल दिसू शकतो.
 
जर आपण आजच्या तरुणांना बघाल तर हे माहित पडेल की फास्ट फॅशनच्या युगात पण आपली पारंपरिक साज शृंगारासाठी त्यांच्यात उमंग, उत्साह आणि कौतुक कायम आहे. कोणताही सण असो वा घरात एखादा प्रसंग मुलांमध्ये कुर्ता-धोती तर तरुणींना नऊवारी घालायला नक्कीच आवडत आहे आणि त्यांच्यात एक वेगळाच उत्साह दिसून येतो. 
 
तर चला जाणून घेऊया महाराष्टीयन साज-शृंगाराबद्दल -
तसे तर पुरुषांसाठी जरा कमी पर्याय असतात, असे सगळ्यांचे मत आहे पण त्यातून चांगला कसं दिसायचं आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया-
 
मराठी माणसाचा पारंपरिक परिधान
धोतर किंवा धोती :- ४-५ मीटरचा लांब कापड ज्याला कमरेवरून व पायांवरून गुंडाळून, गाठ मारून कमरेपाशी बांधून ते नेसले जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील पुरुष अजूनही धोतर घातलेले दिसतात. धोती म्हणजे कमरेला बांधलेला एकच कापड. धोतर घोट्यापर्यंत संपूर्ण पाय झाकला जातो. धोतीचा रंग सहसा पांढरा असतो. तर शुभ प्रसंगासाठी सिल्कच्या कापडात वेगवेगळा रंगातही धोतर मिळतं. नागपूर येथील धोतर फार प्रसिद्ध आहे. राज्यातील उष्णतेचे प्रमाण बघत धोतर अत्यंत योग्य परिधान असल्याचे समजते.
 
कुर्ता :- प्रदेशात असणार्‍या उष्णतेपासून बचावासाठी पांढरा कॉटन कुर्ता घाम शोषून घेण्यास सक्षम ठरतो.  
 
फेटा :- डोक्याला झाकणार्‍या फेटा अर्थात पगडी हे टोपी सारखं असतं जे उन्हाळ्यापासून डोक्याचे रक्षण करतं. लोकमान्य टिळक देखील नेहमी लाल रंगाची पगडी घालत असे.
 
बंडी :- पूर्वी फॉर्मल लूकसाठी हाफ जॅकेटसारखा कुर्ता किंवा शर्ट घालात होते ज्याने उष्णतेपासून बचाव होत असे. बंडी हा परिधान मच्छीमार पण करायचे पण त्यांची मूळ वेषभूषा बघितली तर धोती आणि त्यावर फक्त बंडी असायची.
 
कोल्हापुरी चप्पल :- पायांमध्ये घालायचा उत्तम पर्याय म्हणजे दडस आणि फॅशनेबल कोल्हापुरी चप्पल जी अजून ही फॅशनमध्ये आहे.
 
स्त्रियांसाठी महाराष्ट्रीयन पारंपरिक वेषभूषामध्ये साज- सज्जेसाठी खूप काही आहे जसे -
नऊवारी/लुगडं :- नऊवारी म्हणजे ९ मीटर लांब असली साडी ज्याला लुगडं पण म्हणतात. ज्या प्रकारे धोतर नेसले जाते त्याचप्रकारे लुगडं नेसलं जातं. आपल्या परंपरा आणि आवडीप्रमाणे स्त्रिया ह्याला आपल्या हिशोबानी घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखालपर्यंत नेसतात. नऊवारीवच्या फायदा असा असायचा की शेतातील काम असो वा युद्धाला जायचे असो किंवा घोडेस्वारी करायची असो महिलांसाठी हे परिधान खूप सोयीस्कर होतं.
 
आता बोलूया काही दागिने आणि शृंगारसाठी लागणार्‍या वस्तूंबद्दल-
वेणी/गजरा:- केसांत गुंफण्यासाठी चमेली/जुही किंवा इतर फुलांनी बनवलेली माळ. याने केसांची शोभा वाढते.
नथ:- नथ हे स्त्रियांनी नाकात घालण्याचे एक सोन्याचे आभूषण आहे. मराठी पारंपरिक रूपामध्ये नथ या दागिन्याचं खूप महत्व आहे.
अश्या प्रकारे अनेक दागिने आहेत ज्या आपल्या संस्कृतीची ओळख करुन देतात- कुंड्या, पुतळी हार, कंठी हार, मोहन माळ, ठुशी, वाकी, तोडे, करदोटा, बुगडी, पैंजण,जोडवी, लक्ष्मीहार आणि इतर
 
एकूण हे बघून बरं वाटतं जेव्हा आजही तरुण आपल्या परंपरेकडे फॅशन म्हणून का नसो पण आकर्षित होत आहे आणि सणासुदी किंवा मांगलिक प्रसंगी का नसो पारंपरिक वेशभूषा आणि दाग-दागिने आणि श्रृंगार करुन आपली संस्कृती जपत आहे.