शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (12:44 IST)

गरोदरपणात पायावर सूज येण्याची कारणं आणि उपाय जाणून घ्या

जास्त वजनामुळे नाही, तर गरोदरपणी म्हणून पायांवर येते सूज.
 
आई होणं प्रत्येक बाईसाठी जणू एक वरदानच आहे. परंतु गरोदरपणात बायकांना सकाळी मळमळते, वांत्या होतात, बद्धकोष्ठता, पोटात दुखणं सारख्या अनेक समस्यांना सामोरी जावं लागत. तसेच काही बायकांच्या पायांवर सूज देखील येते. सुमारे 80 टक्के बायकांना सूज येण्याचा त्रास होतो. ज्याला 'वॉटर स्वेलिंग इन प्रेग्नेंसी', 'डिसटेंशन ड्यूरिंग प्रेग्नेंसी' देखील म्हटले जाते. बायकांना वाटते की ही सूज त्यांचे वजन वाढल्यामुळे येत आहे तर याची अनेक कारणे असू शकतात. 
 
चला तर मग आम्ही आपल्याला सांगत आहोत की गरोदरपणात पायांवर सूज का येते आणि त्याला दूर कसं करता येईल. 
 
शरीरात रक्त वाढणे - 
गरोदरपणात आईच्या शरीरात सुमारे 50 टक्के जास्त रक्त तयार होतं, जे पायांवर येणाऱ्या सुजेसाठी कारणीभूत असतं. या मुळे फक्त पायच नव्हे तर हात, चेहरा आणि घोट्या देखील सुजतात. 
 
हार्मोनल बदल -
या कालावधीत बायकांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे शरीरात द्रव आणि सोडियमचे प्रमाण वाढते. तसेच प्रोजेस्टेरॉन, ऐस्ट्रोजन, HCG आणि प्रोलॅक्टीन सारख्या हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे शरीरातील काही भागांमध्ये सूज येते.
 
गर्भाचा आकार वाढणे - 
गर्भाचा आकार सातत्यानं वाढल्यामुळे  ओटीपोटाचा नसा (पेल्विक नसा) आणि व्हिने कॅवा हृदयापर्यंत ऑक्सिजन मुक्त रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो. त्यामुळे रक्तविसरण प्रक्रिया मंदावते आणि शरीराच्या खालील भागात म्हणजेच पायात साठतं. रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या रक्तावर दाब आणल्यामुळे सूज येते.
 
प्री-एक्लेम्पसिया -
प्री-एक्लेम्पसिया ही अशी स्थिती आहे ज्यामुळे गरोदर बायकांच्या रक्तदाबात एकाएकी वाढ होते. ज्यामुळे पायांवर सूज येते. तीव्र उच्च रक्तदाब असलेल्या बायकांना प्री-एक्लेम्पसिया होण्याची अधिक शक्यता असते. 
 
प्रथिनं वाढणं - 
गर्भावस्था च्या 20 व्या आठवड्यात मूत्रात प्रथिनांचे प्रमाण जास्त वाढतात. जे पायात सूज येण्याला कारणीभूत असतात.
 
मूत्रपिंडाचा त्रास -
ज्या बायकांना या पूर्वी कधी ही मूत्रपिंडाचा त्रास झाला असल्यास त्यांना गरोदरपणी या त्रासाला सोसावं लागतं.
 
काय करावं -
* कोमट पाण्यात मीठ घालून किमान 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा.
* पिपरमेन्ट, एरंडेल, किंवा ऑलिव्हचे तेल कोमट करून त्या तेलाची मालीश करावी. जेणे करून रक्तविसरण वाढेल.
* जास्त काळ उभे राहिल्यामुळे देखील सूज येऊ शकते म्हणून जास्त विश्रांती घेणे.
* पायांना जास्त काळ लोंबकळतं ठेवू नये. तसेच एकाच स्थितीमध्ये उभे राहणे किंवा बसणे टाळावे.
* मीठ, सोडियम, कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं पायाला सूज येऊ शकते.
* पोटॅशियमची कमतरता देखील सूज येण्याला कारणीभूत असू शकते. म्हणून आहारात पोटॅशियम असलेले पदार्थ घ्या.
* घट्ट कापडं, मोजे किंवा जोडे घालणे टाळा. या काळात आरामदायी कापडं, आणि आरामदायक जोडे घाला.