कुलपाला लागला आहे गंज, उघडण्यासाठी अवलंबवा या ट्रिक्स
लोखंडाच्या वस्तूंना हवा, पाणी, ओलाव्याने गंज लागतो. त्यानंतर यांना उघडणे कठीण जाते. तसेच गंज लागण्यामुळे समस्या निर्मण होते. ज्यामुळे स्क्रू ड्राइव्हर आणि दूसरे टूल्सने यांना काढणे कठीण होते. फर्नीचरवर स्क्रू लागलेले असतील किंवा दरवाज्यावर कुलूप लावलेले असेल तर यांवर जर पाणी पडले तर उघडणे कठीण होते. या समस्यांवर उपाय म्हणून काही ट्रिक्स अवलंबावा
कास्टिक सोडा
कास्टिक सोडाने तुम्ही या वस्तूंवर लागलेला गंज काढू शकतात.।एका बाऊलमध्ये कास्टिक सोडा आणि पाणी मिक्स करा. मग ब्रशने किंवा स्प्रे बॉटलने हे साफ करा. 15-20 मिनट लावून ठेवावे. मग ब्रश आणि ईयरबड्सच्या मदतीने लागलेला गंज साफ करा. कुलुपामध्ये चाबी टाकण्याच्या जागेत इयरबड्सच्या मदतीने गंज स्वच्छ करा. मग चावीच्या मदतीने कुलूप उघड आणि त्यामध्ये तेल टाकावे. कुलुपात तेल टाकल्यास गंज लागत नाही.
हाइड्रोजन पेरोक्साइड-
याशिवाय गंज लागलेले स्क्रू आणि बोल्टला करणे किंवा उघडण्यासाठी हाइड्रोजन पेरोक्साइडचा उपयोग करू शकतात. गंज लागलेले कुलूप नट आणि बोल्टमध्ये हाइड्रोजन पेरोक्साइड लिक्विड लावून 15-20 मिनट ठेवावे. स्वच्छ केल्यानंतर स्क्रू ड्राइवरच्या मदतीने नट आणि बोल्टला काढून घ्या. लोखंड आणि स्टीलमध्ये लागलेला गंज स्वच्छ करण्यासाठी हाइड्रोजन पेरोक्साइड खूप चांगली वस्तू आहे.याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही वास्तुवरचा गंज काढू शकतात. लोखंडच्या कुलपात लागलेला गंज काढण्यासाठी हाइड्रोजन पेरोक्साइड मदत घेऊ शकतात.
डिझेल किंवा पेट्रोल-
आजकल लोकांच्या घरांमध्ये रॉकेल दिसत नाही. अशावेळेस तुम्ही गाडीमधून थोडेसे पेट्रोल काढून स्क्रू वर लागलेला गंज स्वच्छ करू शकतात.तसेच नट आणि बोल्ट इतर स्वच्छ करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Edited By- Dhanashri Naik