1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

आनंदी राहण्यासाठी या टिप्स अवलंवबा

How to be happy all the time
जीवन निवांतपणे जगण्याकरिता आनंद गरजेचा तर आहेच पण आरोग्यासाठी देखील गरजेचे असतो. जेव्हा तुम्ही प्रसन्न असतात तेव्हा तुम्ही आरोग्यदायी असतात. तसेच आजूबाजूचे वातावरण देखील आनंदी राहते. आजच्या काळात आनंदी रहाणे कठिन झाले आहे. वेळेची कमी, धावपळीचे जीवन, चिंता, थकवा यांमुळे लोक आनंदी दिसत नाही. चला तर जाणून घ्या आनंदी राहण्यासाठी या टिप्स 
 
आपल्या लोकांशी संवाद साधा 
सततची व्यस्त जीवनशैली तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून आणि मित्रमंडळींपासून दूर ठेवते. व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना एकमेकांसाठी वेळ नसतो. यामुळेच आनंदी राहायचे असल्यास आपल्या माणसांसाठी वेळ नक्की काढावा व बोलावे. बोलल्याने दुरावा कमी होतो आणि चिंता तसेच समस्या यांपासून आराम मिळतो आनंदी राहण्यासाठी हा एक नक्कीच चांगला पर्याय आहे. 
 
प्रत्येक काम आनंदाने करा  
धावपळीच्या जीवनात तुमच्याकडे वेळ नसतो, तर तुम्ही एंजॉय करण्यासाठी सुट्यांची वाट पाहतात. तुम्हाला असे वाटते की सुट्टी किंवा रिकामा वेळच तुम्हाला आनंद देऊ शकतो. हे पण चुकीचे आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टींमधे आनंद शोधा. जसे की, सकाळी कुटुंब, पार्टनर किंवा मित्रांसोबत फिरायला जावे. एखादे खेळ किंवा चित्रपट पहावे. वेगवेगळे चविष्ट पदार्थ खावे. यामधून देखील आनंद मिळतो. 
 
योग व व्यायाम  
चिंता आणि उदासीनता या परिस्थितीत मध्ये व्यक्ती आनंदापासून दूर राहायला लागतो. योग, ध्यान व व्यायाम स्ट्रेस फ्री राहण्यासाठी एक चांगला उपाय आहे. यामुळे शरीराचा आकार योग्य राहतो तसेच मन व मस्तिष्क शांत राहते अश्या व्यायमाची निवड करा ज्यामधून तुम्हाला आनंद येईल.  
 
प्रवास करा  
व्यस्त जीवनशैलीमध्ये कही वेळ स्वतासाठी काढाल तर आनंदी रहाल. 2-3 दिवस वेळ काढून एखाद्या प्रवासावर जावे. मित्र, कुटुंब किंवा सोलो ट्रेवलिंग पण तुमचा मूड ताजा करेल. रोजचा थकवा, जीवनाची चिंता यांमधून आराम मिळून मन आनंदी राहिल. 
 
काही नविन शिका  
अनेक वेळेस रोजच्या जीवनशैलीमुळे लोकांना बोर व्हायला होते. याकरिता आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा. काही नविन शिकण्याचे प्रयत्न करावे. कोणतेही वय असो काही नविन शिकण्याची ओढ तुम्हाला आनंद देईल. तुम्ही डांस क्लास, कुकिंग क्लास, पेंटिंग किंवा इतर कोणत्याही एक्टिविटीमध्ये सहभागी होऊन स्ट्रेस कमी करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik