अवचित आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा बेसनाचा हलवा
रवा आणि कणकेचा हलवा तुम्ही अनेक वेळेस खाल्ला असेल. पण कधी बेसनाचा हलवा खाल्ला आहे का? बेसनाचा हलवा चवीला जेवढा स्वादिष्ट लागतो तेवढाच तो बनवायला देखील सोपा आहे. तर चला आज आपण पाहू या बेसनाचा हलवा कसा बनवायचा. तर चला जाणून घ्या रेसिपी.
साहित्य
4 कप बेसन
2 कप तूप
4 कप पाणी
1 कप साखर
2 चमचे पिस्ता
1/2 टीस्पून हिरवी वेलची
2 चमचे बदाम
2 चमचे गुलाब पाणी
केशर
कृती-
सर्वात आधी एक पण गॅस वर ठेवावा. तसेच त्यामध्ये 4 कप पाणी उकळवा. आता साखर, वेलची पूड, केशर घालून सर्व साखर विरघळेपर्यंत तसेच सरबत तयार होईपर्यंत ढवळा. आता दुसरे पॅन मध्ये तूप घालावे. तूप पुरेसं गरम झाल्यावर पिस्ते आणि बदाम घालून दोन मिनिटे परतून घ्या. तसेच हे बेसन पिठात मिक्स करून रंग हलका तपकिरी होईपर्यंत ढवळत राहा, आता बेसन सतत ढवळत राहा, म्हणजे बेसन जळणार नाही. भाजलेल्या बेसनामध्ये तयार सरबत घाला आणि घट्ट होईपर्यंत चांगले मिक्स करा. हलवा साधारण दोन मिनिटे शिजू द्या आणि गॅस बंद करा. त्यात गुलाबजल टाकून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik