होळी विशेष रेसिपी Coconut Roll
साहित्य-
एक कप - नारळ पावडर
अर्धा कप - साखर
१/४ टीस्पून - केशर
अर्धा कप मैदा
१/४ टीस्पून - बेकिंग पावडर
१/४ टीस्पून - मीठ
अर्धा कप तूप
१/४ टीस्पून - वेलची पावडर
अर्धा कप दूध
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात नारळाचा किस, साखर, वेलची पूड आणि केशर नीट मिसळा. नंतर दुसऱ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ घाला. आता त्यात तूप आणि दूध घालून मऊ पीठ बनवा. पीठ १५ मिनिटे बाजूला ठेवा. नंतर पिठाचे छोटे गोळे बनवा. एक गोळा घ्या आणि त्याचा पातळ रोल बनवा. आता नारळाचे मिश्रण रोलच्या एका टोकावर ठेवा आणि ते रोल करा. आता हा रोल बेक करून घ्या. तसेच एका प्लेट मध्ये थंड करा. तर चला तयार आहे आपली नारळाचा रोल रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik