मकरसंक्रांती विशेष रेसिपी : शेंगदाणा-काजू चिक्की
साहित्य-
200 ग्रॅम - शेंगदाणे
एक कप - गूळ
एक कप - दूध
काजू
एक कप - मिल्क पावडर
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्यावे. मग त्याचे साल काढून स्वच्छ करून घ्यावे. तसेच सर्व साल काढून घ्यावे. यानंतर यामध्ये एक कप मिल्क पावडर आणि आठ ते दहा काजू घालावे. आता हे मिक्सरमधून दळून घ्यावे. आता एका पॅनमध्ये दूध उकळण्यास ठेवावे. दूध घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करावा. आता यामध्ये गूळ घालावा व ढवळत राहावे म्हणजे गूळ दुधामध्ये विरघळेल. आता गॅस पुन्हा सुरु करून यामध्ये शेंगदाणे आणि काजूचे मिश्रण घालावे. आता चांगल्या प्रकारे हे मिश्रण एकजीव करावे. आता एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण काढावे व पसरवून घ्यावे. वरून पिस्ताचे काप गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली मकरसंक्रांती विशेष शेंगदाणा-काजू चिक्की रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik