शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (16:29 IST)

Rice Kheer recipe : पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा

Rice Kheer recipe : भारतीय सणांमध्ये खीर महत्त्वाची भूमिका बजावते. शरद पौर्णिमा, वाढदिवस, भंडारा, असो खीर बनवतात. सध्या पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्षात तांदळाची खीर बनवतात. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांदळाची खीर आणि भरडाचे वडे केले जातात. चला तर मग तांदळाची चविष्ट खीर बनवण्याची कृती जाणून घेऊ या. 
 
साहित्य -
दूध - 1 लिटर
तांदूळ - 150 ग्रॅम
साखर - 100 ग्रॅम
सुखेमेवे -काजू, बदाम, मनुका
वेलची-4 
 
कृती- 
तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ एक तास भिजवून ठेवा. आता एका भांड्यात दूध घालून उकळवून घ्या. नंतर दूध उकळव्यावर त्यात भिजत घातलेले तांदूळ घाला आणि 20 मिनिटे शिजवा. नंतर वेलची आणि साखर घालून 15 मिनिटे उकळवून घ्या. नंतर त्यात सुकेमेवे घालून 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. मधून मधून ढवळत राहा. स्वादिष्ट तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit