शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (09:55 IST)

प्लॉट खरेदी करताना या 10 वास्तू टिप्स लक्षात ठेवा

प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं स्वतःचा घरं बनवायचं. त्यासाठी प्लॉट विकत घेतात किंवा तयार घर. जर आपण घर बनविण्यासाठी जमीन किंवा प्लॉट विकत घेत असल्यास वास्तूचे विशेष लक्ष द्यायची गरज आहे. नाही तर आपल्याला समस्यांना सामोरा जावं लागू शकते. असे होऊ नये म्हणून या साठी आम्ही आपल्याला काही वास्तू टिप्स देत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे त्या टिप्स.
 
1 प्लॉटची दिशा पश्चिम, वायव्य किंवा उत्तर, उत्तर पश्चिम किंवा पूर्वीकडे असावी. उत्तर किंवा ईशान्य असल्यास उत्कृष्ट असतं.
 
2 प्लॉट किंवा भूखण्डासमोर कोणते ही खांब, डीपी किंवा झाड नसावे.
 
3 प्लॉटच्या समोर तीन किंवा चार वाट नसाव्यात. म्हणजे प्लॉट तीन रस्त्यावर किंवा चौरस्त्यावर नसावे. 
 
4 प्लॉटच्या घरच्या मजल्याचा उतार पूर्वेकडे, उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेला असावा. यामध्ये उत्तर दिशा देखील चांगली आहे. वास्तविक, सूर्य हा आपल्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. म्हणून आपल्या वास्तूचे निर्माण सूर्याच्या प्रदक्षिणेला लक्षात घेऊन केल्यानं अधिक योग्य असणार.
 
5 भूखण्डाची निवड देखील एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाला विचारून करावी. म्हणजे जमीन लाल मातीची आहे किंवा पिवळ्या मातीची किंवा काळ्या मातीची किंवा तपकिरी मातीची किंवा दगडी आहे. ओसार, उंदरांच्या बिळाची, वारुळाची, फाटलेली, खडबडीत, खड्ड्यांची, टिळा असलेली जमिनीचा विचार करू नये. ज्या जमिनीवर खणल्यावर राख, कोळसा, हाडे, भुसा बाहेर निघत असल्यास अश्या जमिनीवर घर बांधल्याने आणि वास्तव केल्याने आजार येतात तसेच वय कमी होतं.
 
6 प्लॉटच्या भोवती किंवा जवळपास, बेकायदेशीर कामे असलेले कोणतेही ठिकाण, घर किंवा कारखाने नसावे. जसे की मद्य मांस, मटण, मास्यांची दुकाने इत्यादी गोंधळ आणि गोंगाट करणारे कारखाने, जुगारबाजीची कामे, रेस्टारेंट, अटाळेघर इत्यादी.
 
7 श्मशान घर किंवा वाळवंट असलेल्या जागे जवळ जमीन विकत घेऊ नये.
 
8 जमिनीवर घर बनविण्याचा पूर्वी जमीन चांगल्या प्रकारे स्वच्छ करावी नंतर त्याची शास्त्रोक्त शुद्ध करून त्याची वास्तुपूजा करावी आणि त्यामधल्या पिवळ्या मातीचा वापर करून घर बांधावे. 
 
9 प्लॉट खरेदी करताना जमीन बघून घ्यावी. परीक्षण करून बघावे. जमिनीचे परीक्षण अनेक प्रकारे करतात जसे की खड्डा खणून त्यात पाणी भरून चाचणी केली जाते. 
 
10 जमिनीचा उतार देखील बघावा. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे आणि ईशान्य दिशेला असलेली जमीन सर्व दृष्टीने फायदेशीर असते. आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य आणि मध्यभागी कमी असणारी जमीन 'रोगांचे कारण' म्हणून ओळखली जाते. दक्षिण आणि आग्नेयच्या मध्य उंच जमिनीचे नाव 'रोगकर वास्तू' आहे हे रोगांना उद्भवतात. म्हणून जमिनीची निवड करताना एखाद्या वास्तुतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
 
सूर्यानंतर चंद्राचा प्रभाव या पृथ्वीवर जास्त पडतो. सूर्य आणि चंद्राच्या कक्षानुसारच पृथ्वीचे हवामान चालते. उत्तरी आणि दक्षिणी ध्रुव हे पृथ्वीचे दोनकेंद्रे आहेत. उत्तरी ध्रुव बर्फाने व्यापलेला महासागर आहे. ह्याला आर्कटिक सागर म्हणतात तिथेच दक्षिणी ध्रुव अंटार्क्टिका खंड म्हणून ओळखला जाणारा घन पृथ्वीचा प्रदेश आहे. हे ध्रुव वर्षानुवर्षे फिरतात. 
 
दक्षिणी ध्रुव उत्तरी ध्रुवापेक्षा खूपच थंड आहे. इथे माणसांची वर्दळ नसते. या ध्रुवांच्या मुळे पृथ्वीचे वातावरण कार्यरत होतात. उत्तरेकडून दक्षिणी बाजूस ऊर्जा ओढली जाते. संध्याकाळी जसे जसे पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना दिसतात. म्हणून पूर्व, उत्तर आणि ईशान्य कडे जमिनीचे उतार असायला हवे. 
 
याचा अर्थ असा आहे दक्षिण आणि पश्चिमे दिशेला उत्तर आणि पूर्वीकडील दिशेने उंच असल्यास तिथे राहणाऱ्यांना संपत्ती, यश आणि उत्तम आरोग्य मिळत याचा उलट असल्यास संपत्ती, यश आणि आरोग्याच्या तक्रारींना सामोरी जावे लागते. तथापि, एखाद्या वास्तुतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण आपल्या घराची दिशा कोणती आहे हे माहीत नसतं. दिशेच्या निर्देशानुसारच उतार घेण्याचा निर्णय घेतला जातो. जर आपल्या जमिनीचा उतार वास्तुनुसार आहे तर निश्चितच ते आपल्याला श्रीमंत करणार. पण वास्तुनुसार नसल्यास ते आपणास गरीब बनवू शकतं.