बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (10:19 IST)

या वास्तुदोषामुळे घरात भांडण होतात

घर आणि व्यवसायात आनंद आणि समृद्धीसाठी सकारात्मक ऊर्जा असणं खूप महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेच्या ऐवजी नकारात्मक ऊर्जा वाहते तेथे नेहमी अशांततेचे वातावरण असते त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. वास्तुशास्त्र असे शास्त्र आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या घराचीच नव्हे तर इतर कोणत्याही जागेची सकारात्मकता वाढवू शकतो. वास्तुमध्ये प्रत्येक जागेच्या बांधकाम आणि सजावटीला घेऊन देखील काही नियम सांगितले आहेत. बऱ्याच वेळा आपण लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण या गोष्टींना दुर्लक्षित केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाहते. ज्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवतात, चला तर मग जाणून घेऊ या की वास्तुच्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्याने सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवू शकतो.
 
* घराचे मुख्य दार अशी जागा आहे जी ऊर्जेच्या प्रवाहासाठी मुख्य स्थळ आहे म्हणून दार नेहमी असे उघडले पाहिजे की दाराच्या जवळच्या गॅलरीत अंधार नसावा. हवा आणि प्रकाश खेळता असावा. ज्या घरातील दार पूर्णपणे उघडत नाही त्या घरात राहणाऱ्या सदस्यांना मिळणाऱ्या प्रगतीच्या संधी देखील मर्यादितच असतात. म्हणून दार पूर्णपणे उघडणे आवश्यक आहे.
 
* बऱ्याच वेळा असे दिसून येते की बऱ्याच वस्तू अशा असतात ज्यांना लोक विनाकारणच सांभाळून ठेवतात, पण घरात अशा गोष्टी कधीही ठेवू नये. जी तुटलेली किंवा भंगलेली आहे. आपल्या घराच्या कपाटातून अशा गोष्टी त्वरितच काढून टाका ज्या काही कामाच्या नाही. घरात तुटलेल्या आणि भंगलेल्या आणि विनाकामाच्या वस्तुंना ठेवल्यानं घरात नकारात्मकता वाढते जी कौटुंबिक मतभेदाला वाढवते.
 
* घराला नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा. घरात कोळीचे जळमट लागू देऊ नये. आठवड्यातून एकदा घर स्वच्छ करा. मिठाच्या पाण्याने घर पुसून काढा या मुळे घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
* स्वयंपाकघरातील कोणत्याही ऊर्जेचा थेट परिणाम घरातील सर्व सदस्यांवर पडतो. म्हणून कधीही स्वयंपाकघर आणि स्नानगृह सामोरा -समोर किंवा जवळ बांधू नये. जर आपल्या घरात स्वयंपाकघर आणि स्नानगृह समोरासमोर आहे तर स्नानगृहाचे दार कामाशिवाय उघडे नसल्याचे सुनिश्चित करा. जेणे करून नकारात्मक ऊर्जा प्रवेश करता कामा नये.
 
* तुळशीचं रोपटं नकारात्मक प्रभावाला कमी करण्यासाठी तुळशीचं रोपटं सक्षम असत. जेथे तुळशीचं रोपटं लागलेलं असत, तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. म्हणून आपल्या घरात एक तरी रोपटं तुळशीचं लावावं. पण तुळशीचं रोपटं ज्या ठिकाणी लागलेले आहे तिथे स्वच्छता राखावी. घाण हाताने तुळशीला स्पर्श करू नये.
 
* घरात नेहमी हिरवळ असलेली आणि मनाला आनंद आणि शांती देणारी चित्रे लावावी, या मुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. युद्ध, वाळवंट, किंवा रागात असलेले प्राणी यांचे चित्रे लावणे टाळावे. शक्य असेल तर आपल्या घरात एका आनंदी आणि संयुक्त कुटुंबाचे चित्रं लावावे. आपल्या कुटुंबाचे छायाचित्र देखील लावू शकता ज्यामध्ये आपल्या घरातील सर्व सदस्य आहेत.