रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

भाड्याच्या घरात राहाणा-यासाठी मालामाल होण्‍याचे वास्तूप्रमाणे खास उपाय

आजच्‍या काळात वाढणारी महागाई आणि आर्थिक अडचणीमुळे स्‍वत:चे घर घेणे प्रत्‍येकाला शक्‍य नाही. काही लोक आयुष्‍यभर कष्‍ट करूनही स्‍वत:चे घर घेऊ शकत नहीत. आज आम्‍ही आपल्‍याला असे काही उपाय सांगणार आहोत, जे केल्‍यांनतर आर्थिक चणचण भासणार नाही. सुख-समृद्धि वाढेल. 
 
वास्‍तु शास्‍त्रानुसार जर घराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रानुसार झालेले नसेल तर त्‍या घरामध्‍ये राहणा-या व्‍यक्तिंना आनेक संकटाचा सामना करावा लागतो. जर घर स्‍वत:चे असेल तर वास्‍तु दोष दुर करता येऊ शकतात, मात्र घर किरायाचे असेल तर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. 
 
घरमालकाच्‍या परवानगीशिवाय घराची तोडफोड करणे शक्‍य होत नाही. अशा वेळी काय उपाय करायला हावेत याविषयी आज आम्‍ही आपल्‍याला विशेष महिती देणार आहोत. 
 
घरातील उत्तर-पुर्व दिशेला जास्‍त साहित्‍य ठेऊ नका. या दिशेला सामान ठेवल्‍यामुळे वास्‍तु दोष उत्‍पन्न होतात. 
घरातील जड सामान, ज्‍या वस्‍तु वापरात येत नाहीत आशा वस्‍तु घराच्‍या दक्षिण पश्चिम भागात ठेवाव्‍यात. इतर ठिकाणी जड सामान ठेऊ नये. 
 
जेवन करताना आपले मुख दक्षिण-पुर्व दिशेकडे करा. असे केल्‍यानंतर जेवनामुळे पुर्ण शक्‍ती प्राप्‍त होते. 
वास्‍तुशास्‍त्रानुसार सर्वात महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे तुमचे देव-घर कोणत्‍या बाजुला आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. घरातील देव घर उत्तर-पुर्व दिशेला असेल तर लाभदाय ठतरे. जर इतर ठिकाणी देव-घर असेल तर पाणी पिताने मुख उत्तर-पुर्व दिशेकडे करा. 
 
प्रवेशदाराच्‍या समोर सुर्याकडे तोंड असलेल्‍या फुलांचे छायाचित्र लावा. दारासमोर लावण्‍यासाठी सुर्याकडे तोंड असलेल्‍या फुलाचे छायाचित्र लाभदायक ठरते. 
 
घराच्‍या नैऋत्‍य दिशेला अंधार राहणार नाही याची काळजी घ्‍या. याबरोबच वायव्‍य दिशेला जास्‍त प्रकाश घरामध्‍ये लाभदायक ठरत नाही. घरामध्‍ये बोलताना हळू आवाजात बोला. घरामध्‍ये मोठ्या आवाजात वाद घातले तर आभामंडलावर वाईट परिणाम होतो. घराच्‍या बाजुला किंवा समोर वाळलेले झाड असेल तर, काढून टाका.
 
घराचे प्रवेशदार नेहमी स्‍वच्‍छ ठेवा. दारामध्‍ये नेहमी प्रकाश राहिल याची काळजी घ्‍या. असे केल्‍यानंतर घरामध्‍ये सकारात्‍म‍क ऊर्जा राहाते. घरामध्‍ये जास्‍त दिवस कचरा ठेऊ नका. घरातील कचरा वास्‍तु दोष वाढवण्‍यास मदत करतो.
 
घराच्‍या दारावर शुभ चिन्‍ह किंवा श्रीणेशाचा फोटो लावा. देव-देवतांची कृपा प्राप्‍त होते.  वरील दिलेले सर्व उपाय नियमीत केले तर किरायाच्‍या घरामध्‍येही तुम्‍हाला विशेष लाभ होतो.