शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (11:01 IST)

वास्तुपुरुष कोण आहे ?त्यांना आनंदी ठेवणे महत्त्वाचे का आहे ?

पौराणिक मान्यतेनुसार वास्तू पुरुषांची उत्पत्ती भगवान शंकराच्या घामापासून झालेली आहे. संपूर्ण वास्तुशास्त्र यावर आधारित आहे. असे मानले जाते वास्तू पुरुषाचे वर्चस्व सर्व दिशेने प्रबळ आहे. 
 
वास्तुशास्त्रानुसार वास्तू पुरुष खाली जमिनीवर पालथे निजलेले आहे. त्यांचे डोके ईशान्य कोणात म्हणजे उत्तर-पूर्वे कडे, पाय नैरृत्य कोणात म्हणजेच दक्षिण-पश्चिमी दिशेला, त्यांचे हात पूर्व-उत्तर दिशेला तसेच पाय दक्षिण -पश्चिम दिशेला आहेत.
 
एका पौराणिक आख्यायिकेनुसार वास्तुपुरुषाच्या विनवणीवर परमपिता ब्रह्माजीने वास्तुशास्त्राचे नियम बनवले होते. त्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास माणसाला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होण्याची शक्यता असते. वास्तू पुरुष हा प्रत्येक घराचा संरक्षक मानला जातो. म्हणजे वास्तू पुरुष हे इमारतीचे मुख्य देवता मानले गेले आहे. हेच कारण आहे की वास्तू पुरुषाचे निवासस्थान प्रत्येक घर किंवा प्रत्येक बांधकामाच्या आधारे मानले जाते. 
 
वास्तू पुरुषाचे महत्त्व : 
घराचा पाया बांधताना किंवा खणताना, घराचे मुख्य दार लावताना, गृह प्रवेशाच्या वेळीस आणि मुलांच्या लग्नाच्या वेळेस वास्तुपुरुषाची पूजा करावी. असे केल्यास वास्तू पुरुष आनंदी होऊन सुख, समृद्धी, भरभराटी तसेच निरोगी राहण्याचा आशीर्वाद देतात.
 
वास्तू पुरुषाची उत्पत्ती महादेवापासून झाली असल्याने वास्तू पुरुषाबरोबरच शंकराची, श्री गणेशाची आणि परमपिता ब्रह्माची पूजा केली पाहिजे. वेदांच्या मते, कोणत्याही बांधकामाच्या वेळी वास्तुपुरुषाची पूजा केली नाही तर ते बांधकाम शुभ होत नसते..