रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (17:44 IST)

घरी तयार करा गरमा गरम इन्स्टंट भटुरे

साहित्य
2 कप मैदा, 1/4 कप रवा, 1 चमचा साखर, 1/2 चमचा मीठ, 1 चमचा तेल, 1/2 कप सोडावॉटर.
 
कृती
एका पात्रात मैदा, रवा, मीठ, साखर, 1 चमचा तेल घालून मिक्स करा. त्यात सोडावॉटर घाला आणि मिक्स करा. गरजेनुसार त्यात अजून सोडावॉटर मिसळलन मळून घ्या. 5 मिनिटे चांगले 
 
मळून घ्या. मळून झाल्यावर त्यावर ओले फडके टाकून 1/2 तास झाकून ठेवा. नंतर त्या गोळ्याला चांगले एकजीव मळून लहान गोळे तयार करा. पोळ- पाटावर मैदा भुरकून लाटून घ्या.
कढईत तेल तापण्यास ठेवा. तेल तापल्यावर त्यात भटुरे सोडा. आणि तळून घ्या. भटुरे फुगून वर येतील. हे गरम भटुरे छोले बरोबर सर्व्ह करा.