शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (14:43 IST)

घरी तयार करा कुरकुरीत डाळीचे डोसे

साहित्य : १ वाटी तूरडाळ, १ वाटी चणा डाळ, १ वाटी उडीद डाळ, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी तांदूळ, चवी पुरते मीठ, हिरव्या मिरच्या, वाळक्या लाल मिरच्या, १ चमचा मेथीदाणा.
 
कृती : तूर डाळ, चणा डाळ, तांदूळ, उडीद डाळ, मुगाची डाळ, हे सर्व साहित्य ६-७ तास वेगळे-वेगळे भिजवावे. नंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. त्यातच मेथी दाणा, लाल मिरच्या पण वाटून घ्यावे. नंतर ह्या पीठाला ६-७ तास खंबीर येण्यासाठी ठेवावे. नंतर डोसाच्या तव्यावर डोसे तयार करावे. हे गरम डोसे ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.