सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (13:34 IST)

चविष्ट आंबा वडी

साहित्य : 1 वाटी पिकलेल्या आंब्याचा गर, दीड वाटी साखर, 1 वाटी दूध, पिठी साखर थोडीशी, वेलची पूड.
 
कृती : आंब्याचा गर, दूध व साखर हे सर्व साहित्य मिसळून माइक्रोवेवमध्ये 12 मिनिटापर्यंत ठेवावे. नंतर बाहेर काढून त्या मिश्रणाला एकजीव करून पुन्हा एकदा माइक्रोवेवमध्ये 5 मिनिट ठेवावे. नंतर बाहेर काढून त्यात 3 चमचे पिठी साखर व वेलची पूड टाकावी व सर्व मिश्रणाला एका थाळीत जमण्यासाठी ठेऊन द्यावे. वरून चाँदीचा वर्ख लावावे.