Festival Posters
✕

मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत बनणाऱ्या सोप्या पराठा रेसिपी Easy paratha recipes

Updated: गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 (14:47 IST)
 
कृती: सर्व साहित्य एकत्र करून स्टफिंग तयार करा. गव्हाच्या पिठाच्या गोळ्यात हे सारण भरून पराठा लाटा. साजूक तुपावर खरपूस शेका. हा पराठा प्रोटीनने भरपूर असतो.
 
बटाटा-गाजर किसलेला पराठा (No-Mash Potato Carrot Paratha)
साहित्य: १ कच्चा बटाटा (किसलेला व पाणी पिळून काढलेला), १/२ कप किसलेले गाजर, जिरे पूड, कोथिंबीर, मीठ आणि मळलेले गव्हाचे पीठ.
 
कृती: उकडलेल्या बटाट्याऐवजी कच्चा बटाटा आणि गाजर किसून त्यात मसाले मिसळा (वेळ वाचतो). हे सारण पिठात भरून पराठा लाटा आणि शेका.
 
गुळ-तिळाचा पराठा (Sweet Jaggery Paratha)
साहित्य: किसलेला गुळ, २ चमचे पांढरे तीळ, पाव चमचा वेलची पूड, साजूक तूप आणि मळलेले पीठ.
 
कृती: पोळी लाटून त्यावर थोडे तूप लावा. त्यावर किसलेला गुळ, तीळ आणि वेलची पूड पसरवा. त्रिकोणी घडी घालून हलक्या हाताने लाटा आणि मंद आचेवर तुपावर शेका. हा पराठा खूप मऊ राहतो आणि गोड असल्यामुळे मुले आवडीने खातात.
 
मेथी-बेसन पराठा (Instant Methi Besan Paratha)
साहित्य: १ कप गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे बेसन, १/२ कप बारीक चिरलेली ताजी मेथी, हळद, तिखट, ओवा, १ चमचा दही आणि मीठ.
 
कृती: यात वेगळे सारण भरावे लागत नाही! सर्व साहित्य गव्हाच्या पिठात एकत्र मळून घ्या. १० मिनिटांत त्याचे गोल पराठे लाटून तव्यावर शेका. दह्यामुळे हा पराठा दिवसभर मऊ राहतो.
 
टिफिन टिप्स: पराठा मऊ राहण्यासाठी: पराठा शेकताना तेलाऐवजी साजूक तूप किंवा बटर वापरा.पॅकिंग: पराठा थोडा कोमट झाल्यावर बटर पेपर किंवा फॉईल पेपर मध्ये गुंडाळून टिफिनमध्ये द्यावा, ज्यामुळे तो दमट/गीला होत नाही.
ALSO READ: मुलांना टिफिनमध्ये द्या शेझवान रोल्स
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: मेथी-पनीर पराठा: मुलांच्या टिफिनसाठी १० मिनिटांत हेल्दी ब्रेकफास्ट!
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मुलांसाठी रोज टिफिन करिता फक्त १० ते १५ मिनिटांत बनवा हे ५ स्वादिष्ट चिल्ले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

पुढील लेख
Show comments