रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (10:15 IST)

रेस्टारेंट पद्धतीची चविष्ट आणि झणझणीत मिक्स व्हेज भाजी

सध्याच्या कोरोनाच्या काळात बाहेर कुठे ही जाऊन खाण्याचे धाडस होत नाही आणि काही चमचमीत आणि झणझणीत खावेसे वाटल्यास काय करावं. घरात देखील त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे. तर आम्ही आपल्याला आज मिक्स व्हेज रेसिपी सांगत आहोत जी चवीत रेस्टारेंट शैलीची आहे. 
 
साहित्य : 
1/2 कप फ्लॉवर (फुलकोबी), 1/2 कप फरसबी, 1/2 कप गाजराचे काप, 1/2 कप शिमला मिरची चिरलेली, 1/2 कप बटाट्याचे तुकडे, 1/4 कप तेल,1 लहान कांडी दालचिनी, 1 वेलची, 2 लवंगा, 1/4 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीपुरती.
 
मिक्स व्हेजची ग्रेव्ही बनविण्यासाठी लागणारे साहित्य -
2 1/2 कप टॉमेटोचे तुकडे, 1 कप कांद्याचे तुकडे, 2 चमचे काजू, 5 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे आलं जाडसर चिरलेला, 3 चमचे तुकडे केलेली वाळकी काश्मिरी लाल मिरची. 
 
कृती - 
मिक्स व्हेज भाजीसाठी ग्रेव्ही बनविण्याची कृती -
1 एका भांड्यात सर्व साहित्यासह 2 कप पाणी घाला, चांगल्या प्रकारे मिसळा आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे अधून मधून हालवून शिजवावं. नंतर गार होण्यासाठी ठेवावं.
2 गार झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक दळून वाटणं करावं. बाजूस ठेवून द्या.
 
मिक्स व्हेज भाजी बनविण्यासाठीची कृती -
1  मिक्स व्हेज भाजी बनविण्यासाठी, एका पॅन मध्ये तेल गरम करा, त्यामध्ये फ्लॉवर, फरसबी, गाजर, शिमला मिरची, आणि बटाटे घाला आणि गॅस मोठा करून 3 ते 4 मिनिटे भाज्यांचा रंग तांबूस होई पर्यंत परतून घ्या. 
2 गॅस बंद करून द्या, भाज्यांना एका भांड्यात काढून घ्या आणि एका बाजूस ठेवून द्या.
3 आता त्याच पॅन मध्ये तेल टाकून गरम करा, त्यामध्ये दालचिनी, वेलची, लवंग आणि ग्रेव्हीच मिश्रण घाला. चांगल्या प्रकारे मिसळा आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे ढवळत राहा जो पर्यंत त्या मधून तेल सुटत नाही.
4 हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि 1/2 कप पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि मध्यम आचेवर 2 मिनिटासाठी मधून मधून ढवळून शिजवून घ्या.
5 परतलेल्या भाज्या घाला, चांगल्या प्रकारे हालवून घ्या आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटासाठी मधून मधून ढवळून शिजवून घ्या. 
6 मिक्स व्हेज भाजी पोळी किंवा पराठ्यां बरोबर गरम सर्व्ह करा.