गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

झटपट ट्राय करा व्हेज शेवया, जाणून घ्या रेसिपी

vhej
तुम्ही कधी शेवयांमध्ये अनेक भाज्या टाकून खाल्ल्या आहे का? तर चला आज आपण बनवू या व्हेज शेवया, तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील लाईट नाश्ता आहे. 
 
साहित्य-
1 कप भाजलेल्या शेवया 
1/2 कप मिक्स वेजिटेबल (गाजर, मटर, शिमला मिरची, बीन्स) बारीक कापलेले 
1 कांदा बारीक कापलेला 
1-2 हिरवी मिरची बारीक कापलेली
1 टोमॅटो बारीक कापलेला 
1 छोटा चमचा मोहरी 
1 छोटा चमचा जिरे 
8-10 कढी पत्ता 
2 कप पाणी 
2 मोठे चमचे तेल किंवा तूप 
चवीनुसार मीठ 
हिरवी कोथिंबीर
1/2 चमचा लिंबाचा रस 
 
कृती-
एका पॅनमध्ये तेल किंवा तूप गरम करावे.
तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालून कढी पत्ता घालावा.
आता मिरची आणि कांदा घालावा व परतवून घ्यावा.
आता यानंतर टोमॅटो घालावा.
मग मिक्स व्हेजिटेबल टाकावे. 2-3 मिनट शिजवून घ्यावे. 
आता दोन कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
उकळी आल्यानंतर शेवया घालाव्या. व हलवूंन घ्या जेणेकरून गाठी तयार होणार नाही.
आता यामध्ये कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा.
गरम व्हेज शेवया सर्व्ह करा.ह्या व्हेज शेवया झटपट तयार होतात. तसेच खूप पौष्टिक तर असताच शिवाय चविष्ट देखील लागतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik