Dharma Sangrah
✕

Gudi Padwa 2026 गुढीपाडव्यासाठी खास अशा काही पारंपरिक पाककृती

Updated: शनिवार, 14 मार्च 2026 (14:14 IST)
 

२. पुरणपोळी 

महाराष्ट्रातील कोणत्याही सणाची शान म्हणजे मऊलुसलुशीत पुरणपोळी.
साहित्य: चणा डाळ, गूळ, गव्हाचे पीठ, मैदा, तेल, वेलची पूड आणि जायफळ.
 
कृती-
चणा डाळ शिजवून त्यातील पाणी (येळवणी) काढून घ्या.
डाळीत गूळ घालून ते मिश्रण आटवून घ्या (पुरण). हे पुरण वाटून घ्या.
कणीक आणि मैदा मळून त्याचे गोळे तयार करा.
कणकेच्या गोळ्यात पुरण भरून हलक्या हाताने पोळी लाटा आणि तुपावर खमंग भाजा.
 

३. कडुनिंबाचा प्रसाद  

हा या सणाचा सर्वात महत्त्वाचा आणि आरोग्यदायी भाग आहे.
साहित्य-कडुनिंबाची कोवळी पाने, गूळ, ओवा, जिरे आणि चवीनुसार मीठ (किंवा चिंच).
 
कृती-
कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या.
त्यात गूळ, जिरे, ओवा आणि मीठ घालून एकत्र वाटून घ्या किंवा बारीक करा.
हा प्रसाद सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते.
 

४. काजू कोथिंबीर वडी 

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत कोथिंबीर वडी उत्तम लागते.
साहित्य- बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, तीळ.
 
कृती-
कोथिंबीर आणि सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा मळा.
त्याचे लांब रोल करून वाफेवर १५-२० मिनिटे शिजवून घ्या.
थंड झाल्यावर वड्या पाडून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.
 
खास टिप्स-
अळूची भाजी: पुरणपोळीसोबत आंबट-गोड अळूची भाजी (फदफदं) खूप छान लागते.
बटाट्याची भाजी: श्रीखंड-पुरीसोबत सुकी पिवळी बटाट्याची भाजी करण्याचा प्रघात आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments