चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  प्रवासात नेण्याकरिता किंवा घरीच थोडी थोडी भूक असेल तर तुम्ही चटपटीट मसाला मुरमुरे नक्कीच ट्राय करू शकतात. हे झटपट बनतात. तसेच जर तुम्ही वजन कमी करत असला तर नक्कीच खाऊ शकतात चटपटीत मसाला मुरमुरे, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तर चला लिहून घ्या चटपटीत मसाला मुरमुरे रेसिपी 
				  													
						
																							
									  
	 
	साहित्य 
	100 ग्रॅम मुरमुरे 
	2 मुगाचे पापड 
	5-6 लसूण पाकळ्या 
				  				  
	अर्धा चमचा तिखट 
	सेंधव मीठ 
	चवीनुसार मीठ 
	1/4 चमचा हळद 
	 
	कृती 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून पापड टाळून घ्यावे. किंवा पापड भाजू देखील शकतात. यामुळे पापडाचा तिखटपणा वाढेल. आता कढईमध्ये थोडेसे तेल टाकून मुरमुरे फ्राय करून घ्यावे त्यामुळे ते कुरकुरीत होतील. आता या मुरमुऱ्यांमध्ये पापड बारीक करून मिक्स करावे. आता मिक्सरमधून लसूण बारीक करून घ्यावा. त्यामध्ये मीठ, सेंधव मीठ, हळद, तिखट टाकून छान बारीक करावे. व एक पेस्ट बनून तयार होईल. 
				  																								
											
									  
	 
	आता कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये ही पेस्ट टाकावी मग नंतर मुरमुरे टाकावे. व चांगल्याप्रकारे परतवावे. ज्यामुळे मुरमुऱ्यांना मसाल्याचा रंग लागेल. चला तर मग तयार आहे चविष्ट आणि लो कॅलरी वाले चटपटीत मसाला मुरमुरे. ज्यांना तुम्ही संध्याकाळी किंवा प्रवासात खाऊ शकतात. 
				  																	
									  
	
		अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 				  																	
									  
		 
		Edited By- Dhanashri Naik